पारशिवनी नगर पंचायत च्या विषय समिती सभापतींची अविरोध निवड

पारशिवनी नगर पंचायत च्या विषय समिती सभापतींची अविरोध निवड

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी

पाराशिवनी (ता प्र):-पाराशिवनी येथील नगर पंचायतच्या चार विषय सामिती सभापतींची निवड करण्याकरिता शुक्रवारी (११ सप्टेंबर) नगर पंचायतच्या सभागृहात सभा बोलावण्यात आली होती. ही सभा मुख्याधिकारी वजारी यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जोगेन्द्र कटीयारे उपस्थित होत.


दिलेल्या वेळेवर गटनेते सागर सायरे यांनी नावाची यादी निर्णय अधिकार्‍यांना सादर केली. त्यानंतर दिलेल्या वेळेपर्यंत कोणाचाही विरोधात अर्ज न आल्याने निर्णय अधिकार्‍यांनी दिलेल्या नावावर शिक्का मोर्तब करून निर्णय दिला.

त्यानुसार १)बांधकाम सभापती वार्ड क्रमांक २चे नगर सेवक श्री सागर सायरे , २) पाणी पुरवठा सभापती वार्ड कमांक १४ ची नगर सेविका गुलनाज शाकिल शेख, ३)आरोग्य व स्वच्छता सभापति वार्ड क्रमांक ८ची नगर सेविका क उपाध्यक्ष माधुरी ताई भिमटे, ,४) महिला व बाल कल्याण सभापति करिता वार्ड क्रमाक ५ची नगर सेविका निकिता ताई गोन्नाडे , यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष प्रतिभा कुभलकर यांच्या नेतृत्वात सर्व नगरसेवक, सेविका यांनी नवनियुक्त सभापतींनी हार व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी माजी आमदार डि मालिकर्जुन रेड्डी ,डॉ. प्रमोद भड ( तालुका अध्यक्ष वैद्याकिय सेल) जैराम मेहरकुळे ,राजु भोयर ,(पाराशिवनी शहर भाजापा अध्यक्ष)यांच्यासह सर्व नगरसेवक,नगर सेविका, भा ज पा पदाधिकारी आदिंनी नियुक्त सभापतिना पुष्प गुच्छा देऊन शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

शिवाजी महाराजांच्या मुर्तीची विटंबना करणा-यावर कठोर कारवाई करा : कन्हान शहर विकास मंच

Sun Sep 13 , 2020
शिवाजी महाराजांच्या मुर्तीची विटंबना करणा-यावर कठोर कारवाई करा  #) कन्हान शहर विकास मंच व्दारे उप वि. पो. अधिकारी यांना निवेदन.  कन्हान :- मौदा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची अज्ञात समाज कंटकाने विटंबना केली असल्याने शिव प्रेमीसह नागरिकांच्या भावाना दुखावल्याने दोषी समाजकंटकास त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta