शिवाजी महाराजांच्या मुर्तीची विटंबना करणा-यावर कठोर कारवाई करा : कन्हान शहर विकास मंच

शिवाजी महाराजांच्या मुर्तीची विटंबना करणा-यावर कठोर कारवाई करा 

#) कन्हान शहर विकास मंच व्दारे उप वि. पो. अधिकारी यांना निवेदन. 

कन्हान :- मौदा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची अज्ञात समाज कंटकाने विटंबना केली असल्याने शिव प्रेमीसह नागरिकांच्या भावाना दुखावल्याने दोषी समाजकंटकास त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कन्हान शहर विकास मंच व्दारे कामठी उपविभागीय पोलीस अधिकारी हयाना निवेदन देऊन केली आहे. 

       मौदा येथील पावडदौना मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचा उजावा हात तोडुन, चेहरा घासुन मुर्तीची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली असल्याने शिवप्रेमीसह नागरिकांच्या भावाना दुखावल्याने दोषी समाजकंटकास त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी कन्हान शहर विकास मंच व्दारे या घटनेचा जाहिर निषेध करुन कामठी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुंजलवार यांना भेटुन निवेदन देऊन केली आहे.

शिष्टमंडळात कन्हान शहर विकास मंचचे अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, महासचिव संजय रंगारी, नितिन मेश्राम, प्रविण माने, शाहरुख खान, कामेश्वर शर्मा, हरीओम प्रकाश नारायण, मुकेश गंगराज आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

न्यायालयाचे आदेश नसतांना बांधकाम सुरू : प्रशासन झोपेत

Sun Sep 13 , 2020
नगरपंचायत सत्ताधाऱ्यांचा सावळागोंधळ न्यायालयाचे आदेश नसतांना बांधकाम सुरू प्रशासन झोपेत कोरपना : मिळालेल्या माहितीनुसार नगरपंचायत हद्दीतील सन 2017 -18 व्या वर्षात वैशिष्ट पूर्ण नगरोत्थान निधीअंतर्गत दोन कोटीचे 13 कामे सिमेंट काँक्रीट रस्तानाली बांधकामाकरिता एक कोटी 93 लक्ष निधीची कामे अंदाजपत्रक प्रशासकीय आराखडा मंजूर करण्यात आला. उपरोक्त निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला […]

Archives

Categories

Meta