अष्टपैलु व्यक्तिमत्त्व बबनराव वासाडे यांचा कोरोनाने मुत्यु.

अष्टपैलु व्यक्तिमत्त्व बबनराव वासाडे यांचे कोरोनाने मुत्यु. 

#) नवोदित लेखक, कवी, साहित्यीक ,नाटककार उदयोन्मुख हिरा हरपला. 

कन्हान : – अल्पावधीतच साहित्य क्षेत्रा त आपल्या लेखणीचा ठसा उमटविणारे, माजी भारतीय सैनिक, भारतीय विमान उड्डयन विभाग आंतरराष्ट्रीय विमानतळ हैद्राबाद येथे इंटेलिजन्स ब्युरो मध्ये कर्त व्यदक्ष इमिग्रेशन अधिकारी म्हणुन कार्य रत श्री बबनराव भगवानजी वासाडे यां ना कर्तव्यावर कोरोना आजाराने हैदरा बाद दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत दि.१२/९/२० २० ला सायंकाळी ७ वाजता त्याची प्राणज्योत मावळली. ते आपल्या सर्वांना सोडुन देवाघरी निघुन गेले.

         गुरुवर्य श्री बबनभाऊ भगवानजी वासाडे यांचा जन्म टेकाडी (को.ख) ता. पारशिवनी जि. नागपुर येथे १५ नोव्हेंबर १९६२ ला झाला. लहानपना पासुन आई वडीलाचे संस्कारमय जीवन, आध्यात्मि क विचाराचे बाळकडू मिळत त्यांचे जीव न घडले. भाऊ दिलखुश, मनमिळावु व्य क्तिमत्व होते. धार्मिक, सांस्कृतिक, सामा जिक, सांगीतिक कार्यक्रमात निवेदक,स्व तःचे छंद जोपासत उत्तम चित्रकार, उत्कृ ष्ट लेखक, कलावंत म्हणुन ते स्वच्छद प णे जीवन जगले. गरजुना नेहमीच मदत करणारे दानशुर व्यक्तिमत्त्व, जनमानसा त अष्टपैलु कलावंत म्हणुन लोकप्रिय बब नभाऊ मध्ये अहकारांचा किंचित लवले श नव्हता. भाऊ म्हणजे अंत्यत नम्र, सा धा स्वभावाचा, हळवा मनाचा मनुष्य, गा वात आल्यावर लहान मोठा प्रत्येकाशी आपुलकीने, प्रेमाने, विचारपुस करणारा. कोणत्याही प्रायोजित कार्यासाठी सर्वां शी विचार विनिमय करून निर्णय घेणा रा, बालपणापासुन सांस्कृतिक कार्यक्र मांची आवड, आपल्या सहकाऱ्यांना सो बत घेऊन छोटी छोटी नाटके बसविणे, भुमिका वठविणे याच प्रवाहाने त्यांनी आपल्या सहकारी मित्रांना सोबत घेत नवचैतन्य युवा संघ सांस्कृतिक कार्यक्रम घेणारी, सामाजिक कार्य करणारी संस्था निर्माण केली. या छोट्याश्या रोपट्याचे आज वटवृक्ष झाले. त्याच दरम्यान विज्ञा न शाखेतुन पदवी मिळवीत देशसेवेच्या प्रबळ इच्छेने घरच्यांचा विरोध न जुमान ता भारतीय थलसेनेत भरती झाले. नौक री दरम्यान शिक्षण सुरू ठेऊन एम ए – इतिहास व समाजशास्त्राच्या पदव्युत्तर पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर सुध्दा ते स्वस्थ न बसता प्रमोशन मिळवत हवाल दार लिपीक पदावर पोहचले, सैन्यात १६ वर्ष देशसेवा केल्यानंतर सेवानिवृत्त होऊ न भारत सरकारच्या आदिवासी विभाग चंद्रपुरला ३ वर्षे नौकरी केली.१७ ऑक्टो बर २००८ पासुन भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद येथे इंटेलिजन्स ब्युरो मध्ये इमि ग्रेशन अधिकारी म्हणुन रुजु झाले.या दर म्यान नौकरी व्यतिरिक्त आपल्या साहि त्य क्षेत्रातील छंदाची जोपासना करीत अनेक मराठी, हिंदी भाषेत अध्यात्मिक विषयावरील पुस्तके, कवीतेची पुस्तके, अभंगाची पुस्तके लिहिली. त्यांची आज वर श्रीगुरुपाठ, अभंगावली ही अभंगाची, तर “गीत रामायण” हिंदी गीतांचा संग्रह, “गीत कृष्णायन” मराठी गीतांचा संग्रह, “अभंग रामायण” अभंग रूपात रामायण , आणि लेटेस्ट “गीत रामायण” मराठी गीतांचा संग्रह ही अध्यात्मिक भक्तीगीत संग्रह, तसेच “आसवांची ओंजळ” हा मराठी कवितासंग्रह महाराष्ट्र राज्य साहि त्य संस्कृती मंडळ मुंबई यांनी प्रसिद्ध के ला. ‘आठवणींचे पक्षी’ मराठी कविता सं ग्रह अशी ८ प्रसिद्ध पुस्तके प्रकाशित झा ली. काही पुस्तके प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत ज्यात ‘खरा मृत्युंजय’, ‘भीष्म पितामह’ मराठी कादंबरी, ‘मर्यादा पुरुषोत्तम’ मराठी कादंबरी, ‘गुरुदास श्लो क ‘, ‘रामायण’, ‘गृहगीता’, ‘ गुरुदास गी ता’, ‘अभंगवाणी’, ‘यांदो के झरोके से’ हिं दी संग्रह, ‘प्रेम केले म्हणुन’ मराठी तीन अंकी नाटक हे सर्व ग्रंथ त्यांचे कर्तुत्वाचे आहे. त्यांनी दोन वर्षांपासुन टेकाडी गा वात गरजु, गरिबांना मदत म्हणुन “स्व. लक्ष्मीबाई भागवनजी वासाडे” ही सामा जिक संस्था स्थापन करून समाजातील गोरगरिबांना स्व:खर्चाने मदत करण्याचे कार्य केले. गावातील २१ अंत्यत गरीब कुटुंबाना गॅस सिलेंडर कनेक्शन सहित देण्याचे मौलिक कार्य केले. असा हा दान शुर, कर्तृत्ववान, माजीसैनिक, लेखक, कवी, चित्रकार, नाटककार, कादंबरीका र, गझलकार, निवेदक, अभिनेता असे अष्टपैलु व्यक्तीमत्वाचे धनी आपल्यात नाही हे मन मान्य करीत नाही. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच मन एकदम सुन्न झाले. त्यांना समाजाप्रति, गावाप्रति अंत्यत तळमळ असुन भरपुर स्वप्ने भवि ष्यात साकारून चांगले विधायक कार्ये करायची होती पण नियतीला ते मान्य नव्हते. त्यांच्या निधनाने टेकाडी, कन्हान परिसरातील साहित्य,सांस्कृतिक क्षेत्रात जी पोकळी निर्माण झाली ती कधीही भ रून निघणार नाही. अशा अष्टपैलु व्यक्ती मत्वाचे कलावंत बबनभाऊ वासाडे याना भावपुर्ण विनम्र श्रद्धांजली अर्पण. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान दुकानदारानी सायंकाळी ६ वाजता दुकाने बंद करावी. 

Mon Sep 14 , 2020
कन्हान दुकानदारानी सायंकाळी ६ वाजता दुकाने बंद करावी.  कन्हान : – परिसरात कोरोना संसर्ग रोगा चा वाढता प्रादुर्भाव व वाढती रूग्ण सं ख्या लक्षात घेत सामाजिक बांधिलकितु न कन्हान कांद्री दुकानदार महासंघा व्दारे सर्व दुकाने सायंकाळी ६ वाजता बंद करण्याचा निणर्य घेता आहे. यास्तव सर्वानी सहकार्य करावे.        कन्हान […]

Archives

Categories

Meta