आदिवासी गोवारी स्मारकांचे सौंदर्यी करण करण्याची मागणी : कन्हान

आदिवासी गोवारी स्मारकांचे सौंदर्यी करण करण्याची मागणी

 कन्हान नगरपरिषदेला आदिवासी गोवारी समाज संघटनाची मागणी.  


कन्हान : – आदिवासी गोवारी समाज संघटना महाराष्ट्र व्दारे गहुहिवरा चौक तारसा रोड कन्हान येथील “आदिवासी गोवारी स्मारक” नगरपरिषद देखरेखीत घेऊन नवीनिकरण व सौंदर्यीकरण कर ण्याची मागणी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी याना निवेदनाने करण्यात आली. नगरपरिषद कन्हान-पिपरी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी हयाना आदिवासी गोवारी समाज संघटना महाराष्ट्र तालुकाध्यक्ष नेवालाल सहारे यांचा नेतृत्वात शिष्टमंडळ भेटुन चर्चा करित सांगितले की,

दि.१६/०६/०४ ला तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाने आदिवासी गोवारी स्मारकला मान्यता दिली परंतु आज पर्यंत स्मारका कडे प्रशाशनाचे दुर्लक्ष होत असुन सौंदर्यीकरण झाले नाही आहे. त्यामुळे स्मार काजवळ अवैध अतिक्रमण होत आहे. त्यावर नगराध्यक्षा व मुख्याधिकारी नी लवकरात लवकर स्मारकाची पाहानी करून अतिक्रमण हटवुन सौंदर्यीकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले.

याप्रसंगी आदिवासी गोवारी समाज संघटना महाराष्ट्र तालुकाध्यक्ष नेवालाल सहारे, नागपुर जिल्हा महासचिव आनंद सहारे, नगर सेवक अनिल ठाकरे, महेन्द्र भुरे, प्रशांत वाघमारे, श्याम शेंद्रे, देवेंद्र नेवारे, भगवान सरोदे, सुभाष रोकडे, विनोद कोहळे, नारायण सोनवाणे, क्रिष्णा सहारे, अरविंद नेवारे, सुरेश कोहळे, कुबेर पोटभरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात कोरोना चे नविन १२ रूग्ण 

Tue Sep 15 , 2020
कन्हान परिसरात नविन १२ रूग्ण  #)कन्हान३,टेकाडी१,सिहोरा२,खंडाळा(डु) ६ असे कन्हान परिसर ५६७.    कन्हान : – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ८४ लोकांच्या रॅपेट व स्वॅब तपासणीत ६, डोरली केद्राचे ६ असे १२ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ५६७ रूग्ण संख्या झाली […]

Archives

Categories

Meta