पतीने पत्नीस चाकु सारख्या अवजाराने मारून जख्मी केले

पतीने पत्नीस चाकु सारख्या अवजाराने मारून जख्मी केले. 

कन्हान : –  येथील सत्रापुर येथे मोठया मुलाला नेण्यास मनाई केल्याने आरोपी पती विनोद पात्रे यांने पत्नी गुंजा पात्रे ला चाकु सारख्या वस्तुने मारून जख्मी केल्याने फिर्यादी पत्नीच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी आरोपी पती विरूध्द  गुन्हा दाखल करून तपास करित आहे. 

        सोमवार (दि.२१) ला सत्रापुर येथे सकाळी १० वाजता दरम्यान फिर्यादी सौ गुंजा विनोद पात्रे वय ३० वर्ष रा सत्रापुर च्या मोठया मुलास तिच्या सास-याच्या येथे जबरदस्तीने नेत असता तिने नेण्यास मनाई केल्याने पती विनोद किशोर पात्रे वय ३५वर्ष रा सत्रापुर कन्हान याने पत्नी गुंजा हिच्या पायावर चाकु सारख्या वस्तु ने मारून जख्मी करून अश्लिल शिवीगाळ देत तु मला मनाई केली तर तुला सोडणार नाही , अशी धमकी दिल्याने फिर्यादी गुंजा हिने पोलीस स्टेशन गाठुन सायंकाळी ४.४० वाजता तक्रार दाखल केल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी विनो़द पात्रे विरूध्द कलम ३२४, २९४, ५०६ भादंवि नुसार गुन्हा दाखल करून पुढील  तपास सुरू आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

पंतप्रधान मोदी यांच्या जन्मदिवसी रक्तदान शिबीराने सेवासप्ताह सुरू : भाजपा ,भाजयुमो

Tue Sep 22 , 2020
पंतप्रधान मोदी यांच्या जन्मदिवसी रक्तदान शिबीराने सेवासप्ताह सुरू #) भाजपा, भाजयुमो व्दारे ग्राम स्वच्छता व वृक्षरोपनाचे सेवाकार्य.  कन्हान : – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवसी सेवासप्ताहाची रक्त दान शिबीराने सुरूवात करून ग्रामस्वच्छता, वृक्षरोपन आदी सेवा कार्याने भाजपा, भाजयुमो पारशिवनी तालुका, कांद्री-टेकाडी जि प सर्कल व शहर व्दारे सेवा सप्ताह […]

Archives

Categories

Meta