ग्राम विधुत व्यवस्थापक यांचे जिवन अंधारात   

ग्राम विधुत व्यवस्थापक यांचे जिवन अंधारात 

#) ग्राम विधुत व्यवस्थापकांचे ६ महिन्याचे थकीत मानधनाची मागणी.  

कन्हान : – सरकारने तीन हजार लोकसंख्येच्या गावात ग्राम विधुत व्यवस्थापकांची नियुक्ती केली. हे गावातील नागरिकांना चांगली व तत्पर सेवा देत असुन मागील ६ महिन्या पासुन मानधन थकीत असल्याने ग्राम विधुत व्यवस्थापक यांचे जिवन अंधारात आहे. 

     मागील महाराष्ट्र राज्य शासन निर्णय ने २०१६ नुसार ग्रामिण भागातील वीज वितरण व्यवस्था सुधारावी तसेच ज्या गावाची लोकसंख्या तीन हजार असेल त्या गावामध्ये एक ग्राम विधुत व्यवस्थापकाची आय टी आय धारक बेरोजगारांना महावितरण आणि महाराष्ट्र कौशल्य विभागाच्या वतीने १५ दिवसाचे प्रशिक्षण दिल्यानंतर परिक्षा घेऊन ९९६ सक्षम ग्राम विधुत व्यवस्थापकाची नियुक्ती केली , परंतु ५८० रूजु झाल्याने ग्राम विधुत व्यवस्थापक संकल्पना अंमलात आली. सदर ग्राम विधुत व्यवस्थापक गावातील च असल्याने ग्रामस्थाना उत्कुष्ट व तत्पर चांगली सेवा देतात. परंतु यांचे प्रशासकीय नियंत्रण ग्राम पंचायती कडे तर तांत्रिक हे महावितरण शाखा अभियंता या दोन विभागाकडे असल्याने दैनदिनी कार्यात ग्राम विधुत व्यवस्थापकाना अनेक अडचणीचा सामना करित मानसिक त्रा स सहन करावा लागतो. मासिक मानधन हे ग्राम पंचायतचे दोन अधिकारी व महा वितरणचे दोन अधिका-यांच्या सहया झाल्यावरच महावितरण ग्राम पंचायतीच्या खात्यावर पाठविते. ग्रा वि व्यवस्थापकाचा खात्यावर एका कार्यालयीन दिवसात ग्राम पंचायतीने वर्ग करणे बंधनकारक आहे. मात्र मार्च २०२० पासुन ६ महिने होऊन सुध्दा तुटपुंजे तीन हजार रूपये मासिक मानधन मिळाले नसुन थकीत असल्याने परिवारास बिकट परिस्थितीचा सामना करून जिवन अंधकारमय होत आहे.

यास्तव ग्राम विधुत व्यवस्थापकांनी आपआपल्या जिल्हाचे पालक मंत्री, उर्जा मंत्री मा नितीनी राऊत तथा मंत्री बच्चुभाऊ कडु यांना निवेदनाने संपुर्ण नियंत्रण फक्त एका विभागाकडे दयावे, औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन तांत्रिक कामगाराचे प्रति दिवस ६०० रूपये मानधन देय मान्य करावे, ६ महिन्याचे थकीत मानधन त्वरित देण्याची विनंती वराडा गावचे दिनेश चिंचुलकर, जुनिकामठी – निखिल बावणे , घाटरोहना- विलास पाटील, गहुहिवरा धीरज वानखेडे, नागपुर- राधेश्याम मोहरीया, लातुर- अंकुश सातपुते, अमरावती- अश्विन प्रधान, औरंगाबाद- अण्णा चौबे, नाशिक – योगेश गीते आदीने मागणी केली आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

तेजस संस्थेचे माणुकी व सेवेभावेतुन मौलिक कार्याचा परिचय

Tue Sep 22 , 2020
तेजस संस्थेने मृतक आदित्य शिंदेचे प्रभात दवाखान्याचे बिल केले माफ #) तेजस संस्थेचे माणुकी व सेवेभावेतुन मौलिक कार्याचा परिचय.  कन्हान :- सुपर टाऊन येथील राजु शिंदे च्या १८वर्षीय मुलाचा ब्लड कैंसर आजाराने मुत्यु झाला.त्यांची परिस्थिती अंत्यत नाजुक व दवाखान्याचे बिल भरण्यास असमर्थ असल्याने तेजस संस्थेचे चंद्रशेखर अरगुलेवार च्या सेवेभावेतुन डॉक्टरांनी […]

Archives

Categories

Meta