अखेर अज्ञात सहा एजंट व फॉयनान्स कंपनी प्रबंधकावर ठाण्यात गुन्हा दाखल : कन्हान

अखेर अज्ञात सहा एजंट व फॉयनान्स कंपनी प्रबंधकावर ठाण्यात गुन्हा दाखल

कन्हान : – फायनान्स कंपनीच्या एजंट ने जबरीने एक्टिवा गाडी नेल्याप्रकरणी अज्ञात सहा व एका फायनान्स कंपनीचा शाखा प्रबंधक यांच्यावर कन्हान पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर गुन्हा दाखल केला आहे.

        जवाहर नगर कन्हान येथील रोहित मानवटकर यांनी एका फायनान्स कंपनी कडुन कर्जावर एक्टिवा दुचाकी क्र. एम एच ४०- बी पी ९६०७ दोन वर्षांपुर्वी घेतली होती. नियमित कर्जाची परतफेड होत असताना मार्च मध्ये टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर आर्थिक विवंचनेमुळे कर्जाची परतफेड करणे जमले नाही. या संबंधात कंपनीने कोणताही पत्रव्यवहार न करता गेल्या पाच सप्टेंबरला सकाळी ७ वाजताच्या सुमारास कर्जदार घरी नसता ना डुप्लिकेट चाबीने हँडल लॉक उघडुन एक्टिवा दुचाकी घेऊन गेले. या कृत्यां मध्ये सहा व्यक्ती सहभागी होते. या संबंधात कन्हान पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिल्यानंतर हीच तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही मानवटकर यांनी दिली. पण त्यांनीही या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही. परिणामी मानवटकर यांनी कामठीच्या प्रथम श्रेणी न्यायालयात प्रकरण दाखल केले. न्याया लयाने संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतर अखेर कन्हान पोलीसांनी अज्ञात सहा व्यक्ती व शाखा प्रबंधक यांच्यावर सी.आर.पी.सी १५६/३/ भा.दं संहिता १८६० चे कलम ३८९, ३९१ व ३९५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाची पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आत्राम करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कोराणा आजाराने मृत रक्तसबंध वारसदारांना शासकीय योजनेत लाभ

Sun Sep 27 , 2020
*कोराणा आजाराने मृत रक्तसबंध वारसदारांना शासकीय योजनेत लाभ * रक्तसबंध वारसदारांना शासकीय योजनेत लाभार्थी म्हणुन समाविष्ठ कन्हान ता.26 सप्टेंबर मागील काही महिन्यांपासून कोराणा विषाणु व्हायरसचा तीव्र गतीने फैलाव होत असल्याने त्याचाच प्रदुर्भाव हा अनेक सामान्य कुंटूबातील नांगरीकांना व कुंटूब प्रमुखांना या जिवघेणा आजाराचा लागणमुळे जिव गमवावा लागला आहे पण कुंटुबाचे […]

Archives

Categories

Meta