तरुणासह कुटुंबाला मारहाण : वाढोणा( बु .)

तरुणासह कुटुंबाला मारहाण : वाढोणा( बु .)

कळमेश्वर , ता .२७ : क्रिकेट खेळत असलेल्या तरुणांना खेळण्यास हटकणे एका तरुणांस चांगलेच भोवले . तीन तरुणांनी मिळून हटकणाऱ्यासह त्याच्या कुटुंबीयांना जबर मारहाण करून जखमी केले . ही घटना स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाढोणा ( बु . ) येथे घडली . पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केलेली आहे.
संजय मनोहर चौधरी (वय ३३), प्रफुल अरूण ठाकरे (वय२२) व सतीश प्रभाकर ठाकरे वय (१९)सर्वच रा.वाढोणा बु . ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची तर अमित हेमराज राऊत (वय२६) वाढोणा अशी मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी शुक्रवारी दुपारी संजय, प्रफुल व सतीश व एक विधीसंषर्घ बालक हे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळत होते. त्यांच्या या खेळण्यामुळे शाळेच्या इमारतीचे नुकसान होईल म्हणून अमित यांना येथे खेळण्यासाठी हटकले .याचा राग आल्याने आधी आरोपी व अमित मध्ये वाद झाला,
वाद विकोपाला गेला आणि मारहाणीत परिवर्तीत झाला . दरम्यान तेथे अमितचा भाऊ सचिन ,राहुल, आई शिला राऊत व वहिनी प्रियंका राऊत तेथे आल्या असता त्यांना सुद्धा मारहाण करून जखमी केले .
या प्रकरणी अमित व कुटुंबियांनी कळमेश्वर पोलिस ठाणे गाठून आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंद करून अटक केली
पुढील तपास एएसआय लक्ष्मण रुढे हे करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

दोन विभागाच्या दुहेरी आदेशाने शिक्षक हैरान : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ

Mon Sep 28 , 2020
*दोन विभागाच्या दुहेरी आदेशाने शिक्षक हैरान  कन्हान ता.28 सप्टेंबर  : कोवीड 19 प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात 16 मार्च पासून शाळा बंद आहेत.शाळा बंद असल्यातरी सुरूवातीपासूनच शिक्षकांना कोरोना नियंत्रण उपाययोजना  अंतर्गत विविध कामावर लावण्यात आलेले आहे. प्रथम स्वस्त धान्य दुकानावर ,काहींना चेक पोस्ट वर, घरोघरी जावून करावयाच्या निरंतर सर्वेक्षणवर तर काही  शिक्षकांना […]

Breaking News

Archives

Categories

Meta