सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा
सावनेर : येथील एल आय सी च्या कार्यालयात गांधी जयंती दिनी असलेल्या लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया (लियाफी) चा 56 वा स्थापना दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला लियाफी शाखा सावनेर चे अध्यक्ष धनराज निकोसे, सचिव विष्णू डाखरे, कोषाध्यक्ष दीपक निखाडे उपस्थित होते.
दरवर्षी एल आय सी अभिकर्त्याद्वारे मोठया थाटात साजरा करण्यात येणारा लियाफी चा स्थापना दिन यावर्षी कोरोनामुळे साधेपणाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करुन झाली तर महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित एजंटांना एल आय सी प्रशासनाकडे लियाफी संघटनेतर्फे करण्यात येत असलेल्या एजंटांच्या विविध मागण्यांविषयी माहिती देण्यात आली.
एल आय सी निगम गीत व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी पारेश्वर निंबाळकर, सोनल बागडे, लिलेश्वर निर्मल, धवल डुंमरे, रंजन महाजन, रितेश सूर्यवंशी, अभिजित निकोसे, विनोद वासाडे उपस्थित होते.
Thanks for all media member to add liv LIAFI SAONER BR agent federation dsy