राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती ऑन लाईन प्रबोधन कार्यक्रमाने साजरी. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती ऑन लाईन प्रबोधन कार्यक्रमाने साजरी. 

कन्हान : – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची सयुक्त जयंती झुम अॅप व्दारे ऑनलाईन प्रबोधन कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. 

      कार्यक्रमास प्रमुख अतिथी जिजाऊ ब्रिगेट कन्हान अध्यक्षा शिवमती मायाताई इंगोले, प्रमुख वक्ता राष्ट्रीय आर्दश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयचे प्राध्यापक अरविंद दुनेदार सर हयांनी महात्मा गांधी यांचे विचार आजच्या आधुनिक काळात तरूणाईला कसे अंगीकारता येईल या विषयी मार्गदर्शन केले. तसेच सुर्वणा कांबळे सहाय्यक प्राध्यापिका हुजुरवागा गर्ल्स अॅड ज्युनिअर कॉलेज पुणे यांनी लालबहादुर शास्त्री यांच्या बालपणा पासुन ते पंतप्रधान पदापर्यंत च्या जिवनप्रवास प्रभावी शब्दात सांगितला. उपक्रम बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनात व प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे यांच्या संकल्प नेतुन व जिल्हा प्रकल्प अधिकारी दिनेश बाऱई यांच्या नियोजनात राबविण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समतादुत शुभांगी टिंगणे हयांनी केले. कार्यक्रमास पारशिवनी तालुक्यातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

माझे कुटुंब माझी जबाबदारी कन्हान प्रा आ.केन्द्रच्चा बैठाकीत तालुका वेद्याकिय आधिकारी हस्ते शुभारंभ

Wed Oct 7 , 2020
*माझे कुटुंब माझी जबाबदारी कन्हान प्रा आ.केन्द्रच्चा बैठाकीत तालुका वेद्याकिय आधिकारी हस्ते शुभारंभ* कमलासिह यादव पाराशीवनी तालुका प्रतिनिधी पाराशिवनी(ता प्र):-पाराशिवनी तालुक्यात कोरोनाची साखळी तोडून कोरोनाला तालुकातून हद्दपार करण्यासाठी १८सेत्टेबंर रोजी प्राथमिक आरोग्य केन्द येथे माझे कुटूंब, माझी जबाबदारी, माझी जनजागृती या मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केन्दाचे सभागृहात झालेली आशावर्कर,अंगनवाडी सेविक ची […]

Archives

Categories

Meta