महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित प्रादेशिक कार्यालय , नागपूर यांच्या तर्फे सावनेर विभागातील यंत्रचालक यांचा प्रशस्तीपत्राने सम्मान
सावनेर : २ ऑक्टोबर गांधी जयंती चे औचित्य साधून कोरोणा काळात महावितरण मध्ये उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्ती पत्र देऊन कार्यकारी अभियंता श्री भस्मे साहेब सावनेर विभाग ,यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
संपूर्ण जगामध्ये व त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात या वर्षी २०२० मध्ये कोरोना विषाणूचा उद्रेक झाला व त्याचे दैनंदिन जनजिवन तसेच कामकाजावर फार मोठे परिणाम झाले . कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे शासनातर्फे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले तसेच कोरोना केसेस जास्त असणारे भाग कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले . सदर काळात सामाजिक शांतता ठेवण्याच्या दृष्टीने ग्राहकाना अखंडीत विज पुरवठा करणे महत्वाचे होते . लॉकडाऊन व नंतर अनलॉक कालावधीत सर्व ग्राहकांना महावितरणच्या इतर सेवा विहीत कालावधीत पुरवणे महत्वाचे होते.सदर काळात कोरोनामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीत आपण महावितरण कंपनीतील कामकाजाच्या ग्राकांना अखंडीत विद्युत पुरवठा देण्यासाठी तात्काळ विशेष उपाय योजना करणे व वीज पुरवठा सुरूळीत करणे व कोरोना महामारीमुळे प्रशासना द्वारे रितसर घोषीत केलेल्या कन्टेन्मेंट झोन मध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे .
सदर कामगिरी पार पाडतांना सावनेर विभागातील कर्मचारी यांनी दाखविलेली कार्यतत्परता , कर्तव्यदक्षता , निष्ठा व समर्पितवृत्ती या गुणांचा गौरव करून गौरवान्वित करण्यात येत आले . या पुढे सुध्दा कंपनीचे कार्य याच उमेदीने उत्कृष्टपणे करत रहावे असे सांगण्यात आले.