संदीप शेडें शिक्षक यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

*कोलितमारा आदिवासी डोंगराळ, वनाच्छादित दुर्गम पेंच व्याघ्र प्रकल्पातील आश्रमशाळा संदीप शेडें शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर*

कमलासिह यादव
पाराशिवनी तालुका प्रीतानिधी

पाराशिवनी (ता प्र) : स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन (सर फाउंडेशन) महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ‘सर फाउंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड २०२०’ देशभरातील १६९ प्रयोगशील शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांना जाहीर झाला आहे. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, विषय सहाय्यक, साधन व्यक्ती, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता डायट यांचा समावेश आहे. यात महाराष्ट्र राज्यातून प्राथमिक गट(१०३),माध्यमिक गट (२२), क्षेत्रिय अधिकारी गटात (१३), इतर विभाग (०६) असे देशभरातील (१६) राज्यासह एकूण (१६९) जणांचा समावेश आहे.अशी माहिती सर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य समन्वयक हेमा शिंदे, बाळासाहेब वाघ,सिद्धराम माशाळे, नितीन केवटे यांनी दिली.
सर फाउंडेशनने आजपर्यंत शिक्षणविषयक अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहे. रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन भारतीय प्रबंध संस्थान अहमदाबाद, हनी बी नेटवर्क, सृष्टी अहमदाबाद, डायट व शालेय शिक्षण विभाग यांच्यासमवेत विविध उपयुक्त उपक्रम प्राथमिक शिक्षणासाठी राबविले आहे.
सर फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय स्तर नवोपक्रम स्पर्धा २०२०’ मधून या शिक्षकांची राष्ट्रीय स्तरावरून निवड केलेली आहे. ‘एज्युकेशन इनोव्हेशन बँक’ या प्रकल्पांतर्गत हे अवार्ड जाहीर करण्यात आलेले आहे. या पुरस्काराचे वितरण सर फाउंडेशन,स्टीम व जस्ट लर्निंग कडून डिसेंबरमध्ये राष्ट्रीय स्तरावरून कॉन्फरन्समध्ये होणार आहे.
सर फाउंडेशन महाराष्ट्र द्वारा आयोजित ‘राष्ट्रीय स्तर नवोपक्रम स्पर्धा २०२०’ मध्ये नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील अतिशय दुर्गम,डोंगराळ, वनाच्छादित अशा पेंच व्याघ्र प्रकल्पातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोलितमारा येथील उपक्रमशील तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक श्री. संदिप अंबादास शेंडे यांच्या ‘शिक्षण आपल्या दारी’ या नवोपक्रमाला या वर्षीचा ‘राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धा २०२०’ सर फाउंडेशन तर्फे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. अप्पर आयुक्त तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग नागपूर, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नागपूर, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पारशिवनी आणिग्राम पंचायत सरपंच कालिरामउके,उपसरपंच मिराताई रामराज इरपाची सह ग्राम पंचयत सदस्यानी अभिनंदन केले व समस्त गावकरी ,पालक वर्ग शिक्षक वर्गांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान परिसरात नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा : कोरोना अपडेट  

Thu Oct 8 , 2020
कन्हान परिसरात नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा.    #) ३३ संशयिताच्या तपासणीत सर्व निगेटिव्ह, कन्हान परिसर ७९२ रूग्ण   कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आ रोग्य केंद्र कन्हान व्दारे ३३ संशयिताच्या रॅपेट तपासणीत सर्व निगेटिव्ह आढळुन कन्हान परिसर एकुण ७९२ रूग्ण संख्या आहे.         बुधवार दि.६ ऑक्टोंबर […]

Breaking News

Archives

Categories

Meta