शौच्छास गेलेल्या तरुणा चा पाय घसरून मुत्यु

शौच्छास गेलेल्या तरुणा चा पाय घसरून मुत्यु . 

कन्हान : – वेकोली कामठी खुली खदान लागुन जे एन दवाखाना व शिवनगर झोपडपट्टी कांद्रीच्या नाल्यालगत मोकळया जागेतील मोठया खडयात शौच्छास गेलेल्या युवकांचा पाय घसरून पडुन शिवनगर कांद्री येथी ल २२ वर्षीय निखिल गजभियेचा खोल पाण्यात बुडुन मुत्यु झाला. 

      बुधवार (दि.४) ला ११.३० वाजता शिवनगर झोपडपट्टी वार्ड क्र ४ कांद्रीचा निखील सुखलाल गजभिये वय २२ वर्ष हा वेकोली कामठी कोळसा खुली खदान लागुन जे एन दवाखाना व शिवनगर झोपडपट्टी कांद्री च्या मागील नाल्यालगत मोकळया जागेतील माती खोदुन केलेल्या मोठया खडयात पावसाळयाचे पाणी साचुन असल्याने तेथे गेला. त्याचा पाय घसरून पाण्यात पडल्याचे पाहुन मोहल्यातील काही मुलानी त्याच्या घरी जावुन सांगितल्याने घरचे व आजुबाजुच्या लोकांनी खडयातील पाण्याजवळ त्याच्या चपला दिसल्याने निखीलचा पाय घसरून पाण्यात पडल्याची पोलीसांना माहीती दिली. पोलीस लवकर न आल्याने तेथील युवकांनी पाण्यातुन निखिल ला बाहेर काढण्याचा पर्यंत केला परंतु पाणी खोल असल्याने एका तासानी पाण्याबाहेर काढुन दवाखान्यात नेते वेळी पोलीस उशिरा पोहचल्याने तेथील नातेवाईकांनी व लोकांनी पोलीसाना परत करून निखिलला जे एन दवाखान्यात नेले असता कामठीला पाठविले असता तेथील डॉक्टरांनी त्याचा मुत्यु झाल्याचे घोषित केले.

कन्हान पोलीसानी फिर्यादी निकेश रघुनाथ चवरे वय २८ वर्ष रा अंबर कॉलोनी दाबा नागपुर यांच्या तोंडी बयाणा वरून कन्हान पोलीस स्टेशन दाखल करून कामठी उपजिल्हा रूग्णालयात उत्तरिय तपासणी करण्यात आली.  

      मुतक  निखील गजभिये हा एकटा मुलगा असुन आई वडील दोन बहिणी असुन एका बहिणीचा विवाह निकेश चवरे रा दाबा नागपुर यांचे झाला. शांत स्वभाव अभ्यासु निखिल चा वेकोलि कामठी खुली कोळसा खदान लगत अवैध खोदकामाने मोठमोठे खडयात निर्दोष युवकाचा बळी घेतल्याने वेकोलि प्रशासनावर रोष व्यकत करित या परिसातील असलेले मोठमोठे खडे बुजविण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली. 


मुतक तरुण निखिल गजभिये 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

चारपदरी बॉयपास महामार्गा लगत बंद धाब्यात अनोळखी महिलेचा मुतदेह मिळाला

Thu Nov 5 , 2020
चारपदरी बॉयपास महामार्गा लगत बंद धाब्यात अनोळखी महिलेचा मुतदेह मिळाला.  कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग चारपदरी बॉयपास रस्त्यालगत विजापुर(खंडाळा) शिवारातील बंद धाब्याच्या एका खोलीत अनोळखी एका महिले चा तीन – चार दिवसा अगोदचा मृत निवस्त्र मुत्युदेह मिळाल्याने कन्हान परिसरात खळबळ उडाली आहे.      बुधवार (दि.४) ला सकाळी […]

Archives

Categories

Meta