बीकेसीपी शाळेने विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळ करू नये

बीकेसीपी शाळेने विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळ करू नये

ऑनलाईन शिक्षन न देता पालकांना फि भरण्याचा  तगादा

का ? 

कन्हान : – बीकेसीपी शाळा कन्हान व्दारे कोविड-१९ च्या  परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवित्व्याचा विचार व पालकांशी विचार विमर्स न करता शाळेतील  खर्चाच्या नावाने ऑनलाईन शिक्षण न देता सहा महिन्यानंतर विद्यार्थ्याचा ब्राडकास्ट ग्रुप बनवुन वॉटशाप वर अभ्यासक्रम पाठवुन पेपर घेत उत्तर पत्रिका जमा करण्यास पालकांना शाळेत बोलावुन शाळेची पुर्ण फी भरल्याशिवाय उत्तर पत्रिका घेणार नाही, विद्यार्थ्याना वरच्या वर्गात बढती करणार नाही अशा भावनिक तगादा लावल्याने पालकांत शाळेने रोष निर्माण केल्याने संतप्त पालकांच्या तक्रारीवर जि प अध्यक्षा रश्मी बर्वे हयांनी शाळा प्रशासनाने निर्माण केलेल्या समस्या चे पालक, प्रशासन अधिकारी यांचे समक्ष चर्चा करून समाधानाकरिता बैठक लावली. परंतु शाळा व संचाल क मंडळ कमीत कमी ५०% शिक्षण शुल्क कमी करण्याकरिता वारंवार वेळ मागुन शाळेने विद्यार्थ्याच्या भवित्व्याशी खेळ करून पालकांना योग्य न्यायाकरिता उतेजित करू नये. असे तिस-या चर्चा बैठकीत ठणकावले. 

         काही वर्षा पुर्वी इंग्रजी माध्यमाची नावलौकीक असलेली खाजगी बीकेसीपी शाळा कन्हान येथे नर्सरी, केजी १ ते १० पर्यंत विद्यार्थी शिकत असुन कोरोना विषाणु आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संपुर्ण देशात टाळेबंदी व संचारबंदीमुळे मार्च २०२० पासुन शाळा बंद असताना विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन आपात्काळ परिस्थिती शाळेने विद्या र्थाना ऑन लाईन शिक्षण न देता पालकांना शाळेची फी भरण्यास तगादा लावुन अनेक समस्या निर्माण केल्याने जि प अध्यक्षा रश्मीताई बर्वे यांनी पालकांच्या तक्रारीची दखल घेत बुधवारी (दि.२१) ला जि प नागपुर येथे मुख्यकार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापिका प्राथमिक, माध्यमिक व पालकांच्या उपस्थितीत मुख्याध्यापिका नाथ (माध्य), राव (प्राथ) यांनी समाधानकारक उत्तर न देता या विषयी अधिकार नसल्याचे सांगितल्याने अध्यक्षांनी पालकांच्या समाधानाकरिता संस्था चालकांची सोमवा री (दि २६) ला दुस-यादां जि प नागपुर येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा शिवलिंग पटवे, प्राथमिक शिक्षणा धिकारी चिंतामणी वंजारी, गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे, संस्थेचे प्रतिनिधी भाटिया, अँड. शर्मा, मुख्याध्यापिका नाथ मॅडम, राव मॅडम यांच्या बैठकीत पालकांनी ऑनलाईन शिक्षण व फी समस्याचे प्रतिवेदन देऊन समस्याचे निराकरण करून फी कमी करण्याचा आग्रह केला. असता संचालक मंडळ प्रतिनिधीनी शाळेचा खर्चाचा ताळमेळ बसवुन निर्णाया करिता १० दिवसाचा वेळ मागितला. आणि १२ व्या दिवसी झालेल्या तिस-या चर्चेत शाळा प्रशासन, संचालक मंडळा नी झालेल्या चुका मान्य करित फक्त २५% शिक्षण शुल्क कमी करण्याची सहमती दरर्शविल्याने आपण पालकांच्या समस्यांचे योग्य समाधान करावे असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षानी म्हटल्याने संचालक मंडळ प्रतिनिधीनी संस्था चालकांशी विचार विनिमय करण्यास परत पाच दिवसाचा वेळ मागितल्याने तो देत शाळेने विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळ करून शिक्षणाचा बाजार करून पालकांना योग्य न्याया करिता उतेजित कराल तर यापुढे विद्यार्थ्यांचे व पालकांचे हक्क शाळे तच सर्व पालक हे न्यायोचित आंदोलनाच्या मार्गाने मिळवुन घेणार अशी एकमुखी भुमिका ठेवली. याप्रसंगी प्रशांत वाघमारे, मोतीराम रहाटे, रविंद्र वानखेडे,अशोक खंडाईत, आस्तिक चिंचुलकर, दिनेश नानवटकर, दिनेश ढोके, आंनद पाटील, अरूण पोटभरे सह १० वी चे पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

चंद्रशेखर बावनकुळें वर पुन्हा जबाबदारी : पदवीधर निवडणूक

Mon Nov 9 , 2020
*चंद्रशेखर बावनकुळें वर पुन्हा जबाबदारी* “पदवीधर निवडणूक : निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती कामठी : लवकरच होत असलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि प्रदेश भाजपाचे महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पक्षाने पुन्हा जबाबदारी सोपविली आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नागपूर विभाग निवडणूक प्रमुख म्हणून […]

Archives

Categories

Meta