तीन बॅटरी चोरणा-या दोन आरोपींना अटक 

तीन बॅटरी चोरणा-या दोन आरोपींना अटक 

#) स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाची कारवाई. 

कन्हान : – स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाने गोपनिय सुत्राकडुन माहीती घेत कोळसा खदान नं ६ येथुन ३ बॅटरी चोरी करणारे दोन आरोपींना पकडुन सात हजाराचा मुद्देमाल जप्त करून पुढील तपासा करिता कन्हान पोलीसांच्या स्वाधिन केले. 

       कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील टेकाडी तार कंपनी जवळील लक्ष्मी लॉज मधील अज्ञात चोरानी (दि.२४) ऑक्टोबर ला तीन बॅटरी चोरीची तक्रार कन्हान पोलीस स्टेशन ला दाखल होती.

गुन्हे अन्वेशन शाखा नागपु र ग्रामिण पथकास गोपनिय सुत्राकडुन मिळालेल्या गुप्त माहीतीवरून सोमवार (दि.९) ला कोळसा खदान नं.६ येथुन आरोपी १) दिपक रामचरण गौस्वामी वय २२ वर्ष २) राजेश जिलोकी चव्हाण वय ३३ वर्ष दोघे ही रा. खदान नं.६ याना पकडुन त्यांचे जवळुन ३ बॅटरी किंमत ७००० रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करून दोन्ही आरोपींना कन्हान पोलीस स्टेशन येथे आणुन कन्हान पोलीसांना पुढील तपासाकरिता स्वाधिन केले. ही कारवाई स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाचे ए एस आय लक्षीकांत दुबे, हेकॉ विनोद काळे, नापोशि शैलेश यादव, सत्या केठारे, पोशि प्रणय बनाफर, विरेद्र नरड, चालक साहेबराव बेहाडे आदीने यशस्विरित्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नराधमाने १५ वर्षीय मुलीवर केला लैगिक अत्याचार

Wed Nov 11 , 2020
शेजारी नराधमाने १५ वर्षीय मुलीवर केला लैगिक अत्याचार कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा (गणेशी) येथे दुपारी घरी कुणी नसल्याचा फायदा घेत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकटी पाहुन शेजारीच राहणारा विजय सोनवाने या नराधमाने तिच्या घरी जावुन पैश्याचे आमिष दाखवुन तिचेवर लैगिक अत्याचार केल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा […]

Archives

Categories

Meta