शेजारी नराधमाने १५ वर्षीय मुलीवर केला लैगिक अत्याचार

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा (गणेशी) येथे दुपारी घरी कुणी नसल्याचा फायदा घेत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकटी पाहुन शेजारीच राहणारा विजय सोनवाने या नराधमाने तिच्या घरी जावुन पैश्याचे आमिष दाखवुन तिचेवर लैगिक अत्याचार केल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रानुसार मंगळवार (दि.१०) ला दुपारी दोन वाजता दरम्यान बोरडा (गणेशी) येथील आरोपी विजय अशोक सोनवाने वय ३३ वर्ष या नराधमाने शेजारीच राहणा-या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी कुणी नसल्याच्या संधीचा फायदा घेत तिला एकटी पाहुन तिच्या घरी जावुन तिला पैश्याचे आमिष दाखवुन अश्लील चाळे करित जबरदस्तीने संभोग करून तिचा लैगिक अत्याचार केला. घरचे सदस्य घरी आल्यावर मुलीने भावाला घटना सांगितल्याने कन्हान पोलीस स्टेशन गाठुन आरोपी विरूध्द तक्रार दिल्याने कन्हान थानेदार अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात खापरखेडा येथील महिला अ़धिकारी सपोनि लक्ष्मी मलकुवार यांनी आरोपी विजय सोनवाने विरूध्द कलम ३७६ (३) भादंवि, पोस्को कलम ४ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली असुन पुढील तपास करित आहे.