क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची कांद्री ला जयंती साजरी
कन्हान : – ग्राम पंचायत कांद्री येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांना आदरांजली अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

- जाहिराती करिता संपर्क 7020602961
ब्रिटिश जुलमीविरोधात रणशिंग फुकणारे क्रांती सुर्य बिरसा मुंडा यांची जयंती रविवार दि.१५ नोव्हेंबर २०२०ला ग्राम पंचायत कार्यालय कांद्री येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस कांद्रीचे सरपंच बळवंत पडोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदराजंली वाहण्यात आली. क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांनी देशाला स्वतंत्र मिळवुन देण्याकरिता दिलेल्या योगदानाबद्दल उपस्थितानी पुष्प वाहुन अभिवादंन केले.
याप्रसंगी राहुल टेकाम, गणेश सरोदे, अभय जांबुतकर, कुशल पोटभरे, अक्षय देशमुख, पारस मरघडे, निलेश गि-हे, गणेश आकरे, रोशन भोयर, हिमांशु मेहरकुळे, सारंग काळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन राहुल टेकाम यांनी तर आभार प्रदर्शन गणेश सरोदे यांनी व्यकत केले.