महामानवाला अनेक संघटनांनी सावनेर येथे पुष्पहार अर्पण करुन मानवंदना

महामानवाला अनेक संघटनांनी सावनेर येथे पुष्पहार अर्पण करुन मानवंदना

सावनेर : महापरिनिर्वाण दिनानिमित्त बसस्थानकातील डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास शहरातील सामाजिक आणि विविध राजकीय संघटनांनी पुष्पहार अर्पण केले. सरकारच्या सूचनेनुसार कोरोना विषाणूच्या नियमांचे पालन करून नियमांचे पालन करून स्वागत करण्यात आले. बुद्धांची पूजा केली गेली. शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष उत्तम कापसे यांनी डॉ आंबेडकर पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. डॉ. आंबेडकरांच्या चरित्रावर प्रकाश टाकून त्यांचे विचार आत्मसात करण्याचे मार्गदर्शन केले.
       कार्यक्रमास व्यापारी अरविंद चौरगडे, प्रसान थूल, सुनील धोटे, नितीन गोलाईट, आशिष गजभिये, आशिष धांडोळे, गुड्डू पाटील, कुबेरा आदी उपस्थित होते.


     युवा जागृती मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. डॉ. आंबेडकर पुतळ्याला पुष्प अर्पण करुन पूजा करण्यात आली. विक्की शेंडे सचिव, युवा जागृती मंडळ आंबेडकरांनी शिक्षण आणि राज्यघटनेच्या प्रेरणेने नव्या पिढ्यांना दिलेली संजीवनी यावर प्रकाश टाकला. शहरातील डॉ आंबेडकर पुतळा व त्यांच्या घरी महानिर्वाण दिन साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

खापा नगर परिषद मधे सल्ला व मार्गदर्शन केंद्र 

Wed Dec 9 , 2020
खापा नगर परिषद मधे सल्ला व मार्गदर्शन केंद्र  खापा :      खापा नगराध्यक्षा व सदस्याच्या पुढाकाराने खापा नगर परिषद मधे अपंग नागरिकांकरिता सल्ला व मार्गदर्शन केंद्र उघडण्यात आले. वेळोवेळी समाजातील गोर गरिब व अपंग असलेल्या लोकांनसाठी जास्तीत जास्त  लाभ मिळेल असे कार्य करु असे आश्वासन देिले. याप्रसंगी उपस्थित सौ […]

Archives

Categories

Meta