सेवानिवृत्तांचा निधी अडकला ; अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षणाधिका-यांना निवेदन

*सेवानिवृत्तांचा निधी अडकला*

*उपदान, अंशराशीकरण,गटविमा लाभापासून निवृत्त शिक्षक वंचित*

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षणाधिका-यांना निवेदन*


कन्हान : कोणत्याही शासकीय कर्मचा-याची वयाची 58 /60 वर्ष कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारी उपदान,अंशराशीकरन  निधी,गटविमा ही रक्कम ही त्याची उर्वरित आयुष्याची पूंजी असते व नियमानुसार हे सर्व लाभ वेळेत मिळणे अपेक्षित असते.परंतू ही हक्काची राशी त्याला कधीच वेळेवर मिळत नाही. आज जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना सेवानिवृत्त होऊन एक वर्षाचा कालावधी होत आहे परंतू या शिक्षकांना त्यांचे लाभ अजूनही मिळाले नाही.त्यामुळे या शिक्षकांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या संदर्भात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे जिल्हाध्यक्ष धनराज बोडे यांचे नेतृत्वात शिक्षणाधिकारी चिंतामन वंजारी यांना निवेदन देऊन चर्चा केली असता शासनाकडूनच निधी मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.निधी मिळताच संबंधित शिक्षकांना त्यांचे लाभ देण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले.

   शिक्षकांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी  जिल्हा परिषदेने तपासणीची व्यवस्था करावी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक ,पदवीधर शिक्षकांच्या रिक्त जागा पदोन्नतीने भराव्यात,वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यात यावे,भाषा व समाजशास्त्र विषय शिक्षकांपैकी 1/3 पात्र शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी.दरमहा होणा-या वेतन विलंबास जबाबदार असणा-यांवर कार्यवाही करण्यात यावी, थकीत घरभाडे भत्ता काढण्यात यावा.वैद्यकीय देयकाकरीता निधी उपलब्ध करून देण्यात यावा.डीसीपीएस धारकांच्या कपात निधीचा हिशोब देण्यात यावा,शाळांना सादिल अनूदान देण्यात यावे.शिक्षकांची भविष्य निधी अग्रीम देयके,वैद्यकीय प्रतीपुर्ती देयके चेकद्वारे न देता बँक खातेवरच जमा करण्याबाबतचे निर्देश पंचायत समितींना देण्यात यावे,आदि विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी संघटनेच्या प्रतिनीधीमंडळात धनराज बोडे,वीरेंद्र वाघमारे,अशोक डोंगरे, जागेश्वर कावळे, मनोहर बेले,प्रेमचंद राठोड,राजेश राकेश ,राजेश मथुरे,किशोर रोगे,राजेश साव,हरिश्चंद्र रेवतकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान येथे गरजवंत गोरगरीबाना ब्लॅंकेटचे वितरण ; राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम

Sat Jan 2 , 2021
कन्हान येथे गरजवंत गोरगरीबाना ब्लॅंकेटचे वितरण राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम कन्हान 2 जानेवारी : दैनंदिन वाढत असलेली थंडी व या थंडीमध्ये गोरगरीब नागरिक थंडीपासून बचाव व्हावा यासाठी पुढाकार घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे यांच्या नेतृत्वात 2 जानेवारी ला साईमंदिर परिसरात व कन्हान शहरातील गोरगरीब जनतेला मोफत ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. […]

Archives

Categories

Meta