कन्हान येथे गरजवंत गोरगरीबाना ब्लॅंकेटचे वितरण
राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम
कन्हान 2 जानेवारी : दैनंदिन वाढत असलेली थंडी व या थंडीमध्ये गोरगरीब नागरिक थंडीपासून बचाव व्हावा यासाठी पुढाकार घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे यांच्या नेतृत्वात 2 जानेवारी ला साईमंदिर परिसरात व कन्हान शहरातील गोरगरीब जनतेला मोफत ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. . या त्यांच्या उपक्रमाने शहरात सर्वत्र स्तुती होत आहे. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपक्रमाचा लाभ अनेक गोरगरिबांनी घेतला.
याप्रसंगी तेजस बहुउदेशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार, देविदास पेठारे,विनोद कास्त्री, राजाराम बडे,अंबादास खंडारे, मोरेश्वर खडसे,नरेश सोनेकर,अशोक पाटील,शरद बेलेकर, देविदास खडसे,रामू खडसे, कुणाल लोंढे,देवेंद्र खडसे, धनंजय कापसीकर,कृष्णा मेश्राम इत्यादीसह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.