निलज ला नवीन वर्षाचे आगमन रक्तदान शिबीराने

निलज ला नवीन वर्षाचे आगमन रक्तदान शिबीराने

कन्हान : – श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान निलज व नेहरू युवा केंद्र नागपुर आणि रवींद्र चकोले मित्र परिवार यांच्या सयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीरात ३२ युवकांनी रक्तदान करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.

            निलज येथे नवीन वर्षाचे औचित्य साधुन श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान निलज व नेहरू युवा केंद्र नागपुर आणि रवींद्र चकोले मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रविंद्र चकोले (सामाजिक कार्यकर्ता) यांचा वाढदिवसा निमित्त छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलित करून रक्तदान शिबीराची सुरूवात करण्यात आली. या उपक्रमात परिसरातील ३२ युवकांनी रक्तदान केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे माजी उपसरपंच कोठीराम चकोले, ग्रा. पं. सदस्य धनराज चकोले, कवडुजी खंडाते, नरेश मडावी तसेच लाइफ लाइन ब्लड बैंकेचे रविंद्र गजभिये व नेहरू युवा केंद्र चे श्याम मस्के, निलेश गाढवे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन कुणाल पाहुणे यांनी तर आभार प्रदर्शन अक्षय शेषरावजी चकोले यांनी व्यकत केले.. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान निलजचे अध्यक्ष – रंजीत शिंदेमेश्रा म, उपाध्यक्ष सुशील बावणे, सचिव श्रीकृष्णा पाहुणे, सदस्य गण अनिकेत कारेमोरे, होमराज मेश्राम, सुरज चकोले, निखिल कारेमोरे, राहुल पाहुणे, विकास उईके, प्रमोद भोयर, पवन गभने सह ग्रामस्थानी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान ला एकही रूग्ण न आढळल्याने दिलासा

Tue Jan 5 , 2021
कन्हान ला एकही रूग्ण न आढळल्याने दिलासा #) एकही रूग्ण न आढळुन कन्हान परिसर ९२९ रूग्ण.   कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शा ळा कांद्री ला रॅपेट ११, स्वॅब २६ तपास़णी करण्यात आली. यात एकही रूग्ण न आढळुन कन्हान परिसर एकुण ९२९ रूग्ण […]

Archives

Categories

Meta