सिहोरा घाटातुन रेती चोरून नेणारा ट्रॅकटर पकडला

सिहोरा घाटातुन रेती चोरून नेणारा ट्रॅकटर पकडला

कन्हान : – नदीच्या सिहोरा घाटातुन रेती चोरी करून अवैध वाहतुक करणार्‍या बिना नम्बर ट्रॅक्टर ट्रॉली ला कन्हान पोलीसांनी रात्री गस्तीवर असताना पकडुन पाच लाख तीन हजार रूपयांचा माल जप्त करून कारवाई करण्यात आली.

       कन्हान पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरिक्षक महादेव सुरजुसे सह पोलीस कर्मचारी रात्री गस्तीवर असतांना कन्हान नदीच्या सिहोरा रेती घाटा तुन बिना नम्बर ट्रॅकटर ट्रालीत चोरीच्या रेतीची अवैध वाहतुक करताना पांधन रोड हनुमान नगर कन्हान येथे पकडुन फिर्यादी सचिन सलामे यांच्या तक्रारा वरून कलम ३७९ , १०९ भादंवी नुसार गुन्हा नोंद करून ट्रॅक्टर चालक रोशन सेवर लोंढे वय २८ वर्ष रा. पंचशी लनगर सत्रापुर कन्हान याला अटक केली. त्याच्या ताब्यातुन एक ब्रास रेती ३,००० रू व बिना नम्बर ट्रॅक्ट र, ट्राली किंमत ५ लाख रूपये असे एकुण ५ लाख ३ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कन्हान पोलीस स्टेशनचे निरिक्षक अरूण त्रिपाठी यांचे मार्गदर्शनात सहा उपनिरिक्षक महादेव सुरजुसे, जोसेफ, मुकेश वाघाडे, संजु बदोरिया, जितेन्द्र गावंडे, साचिन सलामे हयांनी करून पुढील तपास करित आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

Wed Jan 13 , 2021
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन कन्हान : – अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघा व्दारे नवीन वर्ष २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच जिल्हा परिषद नागपुर चे प्राथमिक शिक्षणा धिकारी चिंतामणजी वंजारी यांच्या हस्ते संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनराज बोडे, सरचिटणीस वीरेंद्र वाघमारे , उपाध्यक्ष मनोहर बेले, राजेश मथुरे, जिल्हा प्रवक्ते अशोक डोंगरे, […]

Breaking News

Archives

Categories

Meta