आरोपीस दोन महिने कारावास व दोन हजार रू दंडाची शिक्षा

पवन मेश्राम यास दोन महिने कारावास व दोन हजार रू दंडाची शिक्षा. 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कलम ३२४, ५०४, ५०६ भादंवि चा आरोपी पवन उर्फ प्रमोद क्षिरसागर मेश्राम रा सिहोरा यांचे विरूध्द पोलीस निरिक्षक यांचे मार्गदर्शनात कामठी न्यायालयात सरकारी वकीलांनी युक्तीवाद करून चांगली बाजु माडल्याने न्यायाधिशाने आरोपी पवन मेश्राम यास दोन महिने कारावास व दोन हजार रूपये दंडाची शिक्षा दिली. 

           पोलीस स्टेशन कन्हान अप क्र. ११२/२०१८ कलम ३२४, ५०४, ५०६ भादंवि मधिल आरोपी पवन उर्फ प्रमोद क्षिरसागर मेश्राम वय २९ वर्ष रा सिहोरा यांचे विरूध्द तत्कालीन थानेदार चंद्रकांत काळे यांचे मार्गदर्शनात नापोशि सचिन शर्मा यांनी तपास करून योग्य साक्षीपुरावे गोळा करून दोषारोपपत्र जे एम एफ सी कोर्ट कामठी येथे दाखल केले. व कोर्ट पैरवी अधिकारी नापोशि प्रकाश धमगाये यांनी कार्यरत कन्हान थानेदार अरूण त्रिपाठी यांचे मार्गदर्शनात साक्षीदाराना साक्ष देण्याकरिता योग्य मार्गदर्शन केले असुन सदर गुन्हयात मा. कोर्टात सरकारी पक्षा कडुन अँड श्रीमती जे एन लडके (घुगे) यांनी परिपुर्ण युक्ती वाद करून सरकारी बाजु मांडल्याने ृगुरूवार (दि.२१) रोजी मा. न्यायाधिश जे एम एफ सी कोर्ट कामठी यांनी पवन उर्फ प्रमोद क्षिरसागर मेश्राम यास सदर गु्न्हयात दोषी ठरवुन दोन महिने कारावास व दोन हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली (दिली).

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन : उत्तम कापसे

Mon Jan 25 , 2021
सावनेरः माजी शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम कापसे यांच्या कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्तम कापसे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले . याप्रसंगी तेली समाज पंच कमिटीचे अध्यक्ष गोपाल घटे , युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष पवन जयस्वाल , शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तीलकचंद माहेश्वरी ,  सामाजिक कार्यकर्ते […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta