पारशिवनी येथे लोकनेते माः रंजीतबाबू देशमुख यांचे अमृत महोत्सव निर्मित रोगनिदान व रक्तदान शिबीर संपन्न

*पारशिवनी येथे लोकनेते माः रंजीतबाबू देशमुख यांचे अमृत महोत्सव निर्मित रोगनिदान व रक्तदान शिबीर संपन्न*

*पारशिवनी*(ता प्र):- लता मंगेशकर हॉस्पिटल हिंगणा नागपूरच्या वतीने लोकनेते माननीय रंजीत बाबू देशमुख यांचे अमृत महोत्सव निर्मित पार्श्वभूमी येथे भव्य रोगनिदान शिबिराचे व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री लोकनेते रंजीत बाबू देशमुख यांचे हस्ते करण्यात आले या प्रसंगी माजी आमदार आशिष देशमुख व माजी समाजकल्याण सभापती हर्षवर्धन निकोसे जिल्हा परिषद सदस्य अर्चना भोयर पंचायत समिती सदस्य मंगला निंबोणी प्रमोद काकडे (जिल्हाअध्यक्ष राजिव गांधी,पंचायत राज,),माजी सरपंच दादाराव सायने गंगाधर काकडे मधुकर बेल्हे प्रमुख उपस्थित होते
माजी मंत्री लोकनेते माननीय रंजीत बाबू देशमुख यांनी तालुक्यातील सर्व रुग्णांना 100% निशुल्क उपचाराच्या लाभ घेण्याचे आवाहन केले. माजी आमदार आशीष बाबू रणजित देशमुख यांनी शिबिरात होणाऱ्या तपासणी व आरोग्य संदर्भात मार्गदर्शन करून शिबिराची सविस्तर माहिती दिली बाल रोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, दंतरोग तज्ञ, व जनरल तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या यशस्वितेसाठी लता मंगेशकर हॉस्पिटल चे विशेषज्ञ डॉक्टर कर्मचारी तसेच महात्मा गांधी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक प्राध्यापक कर्मचारी व कार्यकर्ते तसेच पाराशिवनी चे प्रतिष्ठित नागरिक कर्यकेर्ते यांनी उपास्थित राहुन सहकार्य केले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अवैध मोहाफुल गावठी हातभट्टी दारूच्या अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे धाड

Wed Feb 3 , 2021
अवैध मोहाफुल गावठी हातभट्टी दारूच्या अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे धाड सावनेर येथील ईटनगोटी शिवारातील घटना,1,87,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त सावनेर : तालुक्यातील इटनगोटी शिवारात सुरू असलेल्या अवैध मोहाफुल गावठी हातभट्टीच्या अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाडी टाकून केलेल्या कारवाईत एकूण 187800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना ताब्यात घेतले.रवी रामचंद्र सहारे […]

Archives

Categories

Meta