गॅस सिलेंडर अवैधरीत्या तिन चाकी व चार चाकी वाहनांमध्ये पलटवण्यात असामाजिक तत्व सक्रिय

*गॅस सिलेंडर अवैधरीत्या तिन चाकी व चार चाकी वाहनांमध्ये पलटवण्यात असामाजिक तत्व सक्रिय

* पेट्रोल,डीजल सोबत एल.पी.जी.गॅस दर वाढल्याने सिलेंडर तीन चाकी वाहनात पलटवण्यावर जोम

* एल.पी.जी.गॅस सिलेंडरचा काळाबाजार

कन्हान ता. 7 फेबुवारी

     देशात ,राज्यात तसेच शहरात देखील पेट्रोल व डीझेलचे भाव दिवसे दिवस वाढत चाललेले आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांच जगन मोठे त्रासदायक झाले आहे. तरी देखील पेट्रोल व डिझेल वाहन धारकान नाही लाजाने वाढीव दराने समाधान मानावे लागतात या उलट शहरात दिवसेंदिवस ऑटोरिक्षा
एल .पी .जी .वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्या अनुषंगाने शहरात ऑटो एल.पी.जी. गॅस पंपाची संख्या सुध्दा वाढलेली आहे तसेच काही ठिकाणी मुबलक प्रमाणात ऑटो एल .पी .जी. चे वितरण या पंप स्टेशन्स वरून एल.पी. जी.वाहनधारकांना पुरवण्यात येते .
पंरतु पेट्रोल व डीझेल सोबत एल.पी.जी. गॅस पंपाचा दरात वाढ होत असल्याने घरगुती सिलेंडरचा दरात जास्त प्रमाणात दर न वाढल्याने काही टोळ्या तसेच असामाजिक तत्वातील  व्यक्ती घरगुती वापरातील सबसिडी धारकांचे  एल.पी.जी. गॅस सिलेंडर अवैधरीत्या तिन चाकी व चार चाकी वाहनांमध्ये पलटी करून वापरात आणतात .या टोळ्या तसेच व्यक्ती थोड्याफार पैशासाठी स्वतः सोबत  परिसरातील नागरिकांचा जिव धोक्यात घालून अवैधरित्या दोन ते तीन हजाराचा कीमतीचा मशीन बाजारात सहज उपलब्ध होत असून किंवा कुणा कडून बनून घेऊन एल.पी. जी. वाहनात उपयोग करीत आहे.

संग्रहीत फोटो

घरगुती एल.पी.जी. गॅस सिलेंडर  धारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्याना वेळेवर सिलेंडर उपलब्ध होत नसून घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करून वाहनधारकांना पुरविले जातात त्यामुळे सबसिडी धारकांना नेहमीच एल.पी. जी. गॅस सिलेंडर चा तुटवड्या सामना करावा लागतो. 
सणांचा महिन्यात सामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने तारेवरची कसरत महिलांना व पूरूष धारक मंडळीला करावी लागते नाइलाजास्तव त्यांचा हक्काची सबसिडीचे हेच गॅस सिलेंडर म्हणुन अशा टोळ्याकंडन अवैध(ब्लॅक) मध्ये घेण्याची नामुष्की सामान्य नागरिकांवर येते हे ,आता मात्र नित्याचेच झालेले आहे .
    या अवैध गॅस पुरवण्यासाठी कन्हान,पिपरी, कांन्दी ,कोयला खदान परिसरात व कामठी ग्रामीण भागात अनेक कार्यरत आहेत पोलीस प्रशासनाने तसेच अन्नपूठा शासकीय अधिकारानी त्वरीत कार्यवाही करून परिसरात सर्व अवैधरित्या  एल.पी.जी. गॅस सिलेंडर चा काळाबाजार व घरगुती  एल.पी.जी.वाहनात वापरण्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी अशी सुज्ञ नागरीकाडुन धबक्या आवाज करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

केकेबीपी टोल प्लाजावर विनामूल्य आरोग्य व नेत्र चिकित्सा शिबीर

Fri Feb 12 , 2021
केकेबीपी टोल प्लाजावर विनामूल्य आरोग्य व नेत्र चिकित्सा शिबीर कन्हान ता. 11 : कन्हान कामठीच्या जागेवर केकेबीपी टोल प्लाजावर विनामूल्य आरोग्य व नेत्र चिकित्सा शिबिर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारा निर्देशित मार्ग सुरक्षा अभियान, दिशानिर्देश नागपुर बायपास कंट्रक्शन प्रा.लि. महामार्ग तरफ 44 मध्ये केकेबीपी टोल प्लाझावर शिबीराचे आयोजन करण्यात आले […]

Archives

Categories

Meta