कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती थाटात साजरी

*कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती थाटात साजरी*

कन्हान – कन्हान येथे कन्हान शहर विकास मंच द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित मा.श्री निलकंठ मस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला हार माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करीत परिसरात मिठाई वाटप करुन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
शुक्रवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित मा.श्री निलकंठ मस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता मंच सदस्य अखिलेश मेश्राम व मंच महिला सदस्य पौर्णिमा दुबे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनावर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात सर्व मंच पदाधिकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेस पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत परिसरात मिठाई वाटप करुन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली . कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंच महासचिव संजय रंगारी यांनी केले तर आभार मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांनी मानले .
कार्यक्रमात कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , प्रकाश कुर्वे , सुषमा मस्के , पौर्णिमा दुबे , वैशाली खंडार , अखिलेश मेश्राम , प्रवीण माने , निलकंठ मस्के , मनिष शंभरकर , मुकेश गंगराज , अजय चव्हान , शाहरुख खान सह अनेक मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान नदी प्रदुषण मुक्त करून जिल्हयाचे पिण्याच्या पाण्याचे प्रमुख स्त्रोत कन्हान नदी संरक्षित करा 

Fri Feb 26 , 2021
कन्हान नदी प्रदुषण मुक्त करून जिल्हयाचे पिण्याच्या पाण्याचे प्रमुख स्त्रोत कन्हान नदी संरक्षित करा.    #) ग्रामोन्नती प्रतिष्ठान कन्हान-पिपरीचे अध्यक्ष प्रकाश जाधव च्या नेतुत्वात शिष्टमंडळाचे मा जिल्हाधिका-याशी चर्चा करून निवेदन.  कन्हान : – ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी चे अध्यक्ष व क्षेत्राचे माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतुत्वात शिष्टमंडळाने मा. रविंद्र […]

Archives

Categories

Meta