रेती चोरून नेताना ट्रक्टर ट्राली पकडुन ५ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त

रेती चोरून नेताना ट्रक्टर ट्राली पकडुन ५ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त. 


कन्हान : –  नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग कांद्री परिसरात अवैध रेती चोरून ट्रक्टर ट्रालीने वाहतुक करताना पकडुन ट्रक्टर, ट्राली सह १ ब्रॉस रेती असा एकुण ५ लाख ३ हजार रूपयांचा मुद्देमाल कन्हान पोलीसानी जप्त केला. 

         परिसरातील पेंच व कन्हान नदी पात्रातुन अवैधरित्या रेती चोरी मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. बुृधवार (दि.२४) ला सकाळी ४. ४५ ला नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल ऑर्किट जवळ कांद्री येथे अवैधरित्या रेती चोरून कन्हान कडे नेताना ट्रक्टर क्र एमएच ४० बी ई ११२७ व ट्रॉली क्र एम एच ४० एल ४३५१ मध्ये १ ब्रॉस चोरीची रेती वाहतुक करताना आरोपी ट्रक्टर चालक अशोक भलावी वय २८ रा निमखेडा यास पकडुन कन्हान पोलीसानी ट्रक्टर ट्रॉली किमत ५ लाख व १ ब्रॉस रेती ३ हजार असा एकुण ५ लाख ३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास थानेदार अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पोउपनि जावेद शेख करित आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कैलास खंडार यांची दुरसंचार सलाहकार समिती  सदस्य पदावर नियुक्ति

Fri Feb 26 , 2021
कैलास खंडार यांची दुरसंचार सलाहकार समिती  सदस्य पदावर नियुक्ति कन्हन : – नागपुर जिल्ह्यकरिता गठित झालेल्या दुर संचार सलाहकार समिती सदस्य पदावर श्री कैलास खंडार यांची नियुक्ती करण्यात आल्याने परिसरातल्या विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करीत पुढील वाढचालीस शुभेच्छा दिल्या.         श्री कैलास खंडार यांची नियुक्ती संचार मंत्रालय  […]

Breaking News

Archives

Categories

Meta