कन्हान पोलीस स्टेशन येथे महाशिवरात्रि निमित्य बैठकीचे आयोजन : जुनी कामठी कामठेश्वर शिवमंदीर यात्रा झाली रद्द

*कन्हान पोलीस स्टेशन येथे महाशिवरात्रि निमित्य बैठकीचे आयोजन*

*कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असल्यामुळे जुनी कामठी कामठेश्वर शिवमंदीर यात्रा झाली रद्द*


कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन येथे महाशिवरात्रि निमित्य बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन परिसरात कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असल्यामुळे कामेश्वर शिवमंदीर यात्रा रद्द करण्यात आली आहे .

पारशिवनी तालुक्यातील जुनी  कामठी ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या महाशिवरात्रि  त्रिवेणी संगम स्थित भोसले कालिन निर्मित कामठेश्वर शिव मांदिर  यात्रा दिनांक २ ते  ४ मार्च ला भरणार होते . परंतु कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असल्यामुळे बुधवार दिनांक 03 मार्च 2021 ला दुपारी 12 वाजता कन्हान पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा अध्यक्षतेखाली महाशिवरात्रि निमित्य बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन या बैठकीत 1) श्री कामठेश्वर शिवमंदीर देवस्थान जुनी कामठी २) इंदर काॅलोरी नं ६ येथील शिवमंदीर देवस्थान , ३) मळीबाबा मंदीर टेकाडी काॅलोनी वह ४) गहुहिवरा चौक शिवमंदीर देवस्थान अश्या सर्व देवस्थाना चे पदाधिकारी यांना बैठकीत बोलवुन त्यांना कळविण्यात आले कि कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असल्यामुळे मा.श्री जिल्हाअधिकारी साहेब यांचा  ‌आदेशानुसार सर्व प्रकारच्या मंदीर व यात्रेवर बंदी घालण्यात आलेली आहे . त्यामुळे आपण संबंधित मंदीरात यात्रा भरविता कामा नये अशा प्रकारच्या विविध सुचना पोलीस प्रशासना कडुन देण्यात आले आहे .

या बैठकीत युगयंद छाल्लानी , गजानन आसोले , लाला खंडेलवाल , अनिल अग्रवाल , जि.एम हिरणवार , प्रकाश हिरणवार , प्रकाश सिरिया , भुषण इंगोले , संजय गाथे , छोटेलाल माणीकपुरी , आशविन गजभिये सह शिव मंदिर देवस्थान  कमेटी चे सर्व पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

एसटी महामंडळ चे अर्धी तिकिट कार्ड वाटप

Fri Mar 5 , 2021
एसटी महामंडळ चे अर्धी तिकिट कार्ड वाटप कामठी : जवळील खैरी गावात आज दिनांक 3/3/2021खैरी ग्रामपंचायत येथे कोविड-19 चे आदेश नियम पाळून गावातील जेष्ठ नागरिक यांना कोरोना विषयी माहिती देण्यात आली. माहिती मध्ये तोंडाला मास्क, हात स्वच्छ धुणे,सोशल डीस्टन चे पालन करणे तसेच साशनाच्या नियमाचे पालन करणे अशी जेष्ठ नागरिकांना […]

Breaking News

Archives

Categories

Meta