जुनिकामठी ला शासनाच्या नियमाचे पालन करून महाशिवरात्री साजरी  

जुनिकामठी ला शासनाच्या नियमाचे पालन करून महाशिवरात्री साजरी


कन्हान : – दरवर्षी महाशिवरात्री हा उत्सव “हर हर महादेव, बम बम भोले” च्या गजरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासनाच्या नियमाचे पालन करून महाशिवरात्री उत्सव जुनिकामठी ला शांततेत साजरा करण्यात आला.

          पारशिवनी तालुक्यातील जुनीकामठी येथील त्रिवेणी संगम कन्हान नदी काठावर असलेल्या कामठे श्वर शिवमंदीरात ३५० वर्षापासुन सतत महाशिवरात्री यात्रेत हजारो शिवभक्त दर्शनाचा लाभ घेत होते. परंतु यावेळी कोविड -१९ मुळे ही यात्रा रद्द करून मंदिर कमेटी द्वारे बुधवार मध्यरात्री पासुन गुरुवार च्या पहाटे पंचद्रवांनी स्नान करून अभिषेक व आरती करून साधेपणाने महाशिवरात्री साजरी करण्यात आली. या वर्षी नागरिक हजारोंच्या संख्येत न येता. मोजक्या  नागरिकांनी मंदिरात येऊन शिवपिंडी वर बेलपत्ती, पुष्प वाहुन पुजा अर्चना केली.

 श्री कामेश्वर शिव मंदीर देवस़्थान कमेटी व्दारे नागरिकांना मास्क सेनिटाइजर व सोशल डिस्टसिंग चे पालन करून प्रसाद वितरण करून महाशिवरात्री उत्सव शांततेत साजरा करण्यात आला. मंदीर परिसरात कन्हान पोलीसाचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या उत्सवाच्या यशस्विते करिता युगयंद छाल्लानी, अँड गजानन आसोले, लाला खंडेलवाल, अनिल अग्रवाल, जि. एम हिरणवार, प्रकाश हिरणवार, प्रकाश सिरिया, भुषण इंगोले, संजय गाथे, छोटेलाल माणीकपुरी सह श्री कामठेश्वर शिव मंदीर देवस़्थान कमेटी चे पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

महावितरण कंपनी द्वारे सवलत देवुन घरगुती विज कापणी थांबवावी

Mon Mar 15 , 2021
महावितरण कंपनी द्वारे सवलत देवुन घरगुती विज कापणी थांबवावी कन्हान ता.15 मार्च     घरगुती विज बिल न भरल्याने महावितरण कंपनी द्वारे कन्हान शहरात अंतर्गत विज कापणी करीत असून यावर सवलत देवुन घरगुती विज कापणी थांबवावी अशी  उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्याशी चर्चा व निवेदनातून युवा सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार यांच्याद्वारे […]

Breaking News

Archives

Categories

Meta