कन्हान शहरात सेनिटाइजर ची फवारणी करण्याची मागणी : कन्हान शहर विकास मंच  

*कन्हान शहरात सेनिटाइजर ची फवारणी करण्याची मागणी*

# ) कन्हान शहर विकास मंच चे नप कार्यालय अधिक्षक व नगराध्यक्षांना निवेदन


कन्हान – कन्हान – पिपरी शहरात गेल्या काही दिवसान पासुन कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असुन सुद्धा कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासना द्वारे कुठल्याही प्रकारची सेनिटाइजर ची फवारणी  न करीत असल्यामुळे व शहरात कोरोना चा विस्फोट होण्याची दाट शक्यता वाढल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर यांचा नेतृत्वात कन्हान – पिपरी नगरपरिषद चे कार्यालय अधिक्षक सुशांत नरहरे व नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांचाशी भेटुन व या विषयावर चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन कन्हान शहरात नियमित सेनिटाइजर ची फवारणी करण्याची मागणी केली आहे व वाढत असलेल्या कोरोना चा फैलाव थांबविण्याकरिता त्वरीत उपाय योजना करण्याची मागणी केली आहे .

निवेदनात सांगितले आहे कि कन्हान – पिपरी शहरात गेल्या काही दिवसान पासुन कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असुन सुद्धा नगर परिषद प्रशासन द्वारे कुठल्याही प्रकारची सेनिटाइजर ची फवारणी करीत नसुन शहरातल्या बाजारपेठेत सोशल डिस्टेसिंग , मास्क चा वापर होत नसल्याने कन्हान शहरात कोरोना रुग्णांची संख्या अति वेगाने वाढत आहे . कन्हान शहरा पासुन काही अंतरावर असलेल्या वराडा गाव हे कोरोना हाॅटस्पाॅट झाले असुन वराडा गावतले नागरिक कन्हान शहरात येऊन भाजीपाला , दुध  व इतर सामग्री चे दुकान लावुन  विक्री करत असल्याने कन्हान शहर कोरोना हाॅटस्पाॅट होण्याची दाट शक्यता वाढली आहे . कन्हान शहर ही एक मोठी बाजारपेठ असुन आजु – बाजुच्या ग्रामीण भागातुन शेतकरी व नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी – विक्री करण्याकरिता येत असतात त्यामुळे कन्हान शहर कोरोना हाॅटस्पाॅट होण्याची शक्यता नाकारता येत नसुन शहरात सेनिटाइजर ची फवारणी करण्याची गजर भासली असुन कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर यांचा नेतृत्वात कन्हान – पिपरी नगरपरिषद चे कार्यालय अधिक्षक सुशांत नरहरे व नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांचाशी भेटुन या विषया वर चर्चा करुन व एक निवेदन देऊन कन्हान शहरात सेनिटाइजर ची फवारणी करण्याची मागणी केली आहे व वाढत असलेल्या कोरोना चा फैलाव थांबविण्याकरिता त्वरीत उपाय योजना करण्याची मागणी केली आहे . 

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , शाहरुख खान , प्रवीण माने , सुषमा मस्के , वैशाली खंडार , पौर्णिमा दुबे , प्रकाश कुर्वे , सोनु खोब्रागडे , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

नागनदीच्या दुषित पाण्याने कन्हान नदी झाली गटारगंगा

Thu Mar 18 , 2021
नागनदीच्या दुषित पाण्याने कन्हान नदी झाली गटारगंगा #) कन्हान, नागनदी संगमाने सावंगी (चापेगडी) परिसर प्रदुषणाच्या विळखळयात.  #) जिवनदाहीनी कन्हान नदी प्रदुषण मुक्त करून नदीचे संवर्धन व संगोपन करा.  कन्हान : –  नागपुर शहराचे मलमुत्र, घाण वाहणरी नागनदी कुही तालुक्यातील सावंगी (चापेगडी) येथे कन्हान नदीला मिळणा-या संगमा पासुन प्रचंड प्रदुषित हो़ऊन परिसरातील […]

Breaking News

Archives

Categories

Meta