सचिव हरिदास रानडे यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध

*टेकाडी ग्रा पं चे सचिव हरिदास रानडे यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध*

कमलसिंह यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी

*पारशीवनी* (ता प्र):- पोलीस पाटील संघटना , महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने पारशिवणी तालुक्यातील टेकाडी(को ख) ग्रामपंचायत चे व्ही. डी. ओ.(ग्राम सचिव)श्री. हरिदास रानडे यांनी राज्यातील पोलीस पाटील यांच्या बद्दल वृत्त पत्रातून चुकीचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यातील पोलीस पाटील यांच्या भावना दुखावल्या गेल्या. टेकाडी ग्रा पं चे सचिव हरिदास रानडे यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करून त्यांच्यावर ती कडक कार्यवाही करण्यात यावी , यासाठी दिनांक 20 एप्रिल 2021 रोजी दुपारी नागपूर जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यपालन अधिकारी (पंचायत) मा. श्री . भोयर साहेब व पाराशिवनी पंचायत सामिती चे खंड विकास अधिकारी अशोक खाडे यांना त्यांच्या कार्यालयात भेटून सविस्तर चर्चा करून लेखी निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना संघटनेचे राज्य अध्यक्ष दिपक पालिवाल ,राज्य कार्यकारीनी सदस्य श्री. रामरावजी उके , श्री. योगेश लांजेवार, विर्दभ चे पोलिस पाटिल व पारशिवनी तालुका चे पोलिस पाटिल मोठी संखयेत उपास्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ग्रामिण रुग्णालय पारशिवनी येथे २०अक्सिजन बेडची व्यवस्था करता येऊ शकते : गज्जु यादव (महासचिव जिल्हा कॉंग्रेस)

Fri Apr 23 , 2021
*ग्रामिण रुग्णालय पारशिवनी येथे २०अक्सिजन बेडची व्यवस्था करता येऊ शकते*.गज्जु यादव,(महासचिव जिल्हा कॉंग्रेस) कमलसिह यादव पारशिवनी तालुका प्रतिनिधी *पारशिवनी*(ता प्र):-मः रा ऊर्जामंत्री तसेच नागपुर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ना जि ग्रा महासचिव उदयसिहं उर्फ गज्जु यादव यांचे सोबत सोमवारी (दि. १९) पारशिवनी तालुक्यातील कोरोना स्थितीबद्दल माहिती जाणून घेतली. दरम्यान […]

Archives

Categories

Meta