कन्हान येथे पिपळाचे वृक्ष लावून ऑक्सीजनची प्रतीक्षा

कन्हान येथे पिपळाचे वृक्ष लावून ऑक्सीजनची प्रतीक्षा

#) अमोल साकोरे मित्र परिवार यांचे जनहितार्थ सहकार्य

कन्हान – कन्हान शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असुन ऑक्सीजन न मिळत असल्यामुळे किती तरी लोकांचा बळी जात असल्यामुळे परिसरातल्या नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने अमोल साकोरे मित्र परिवार द्वारे कन्हान परिसरात ठिक ठिकाणी पिपळाचे वृक्ष लावुन नागरिकांना ऑक्सीजन मिळण्याकरिता जनहितार्थ सहकार्य केले .

कन्हान शहरात व परिसरात कोरोना रूग्णाची वाढती संख्या आणि मुत्यु दर सुध्दा वाढु लागल्याने नागरिकांच्या हितार्थ कोरोना विषाणु महामारी रोखण्याकरिता कोरोना साखळी तोडुन कोरोना हद्दपार करण्याकरिता व नागरिकांना ऑक्सीजन मिळण्याकरिता अमोल साकोरे मित्र परिवार द्वारे मंगळवार दिनांक २७ एप्रिल ला कन्हान परिसरात विविध ठिकाणी पिपळाचे झाड लावुन जनहितार्थ सहकार्य केले असुन नागरिकांनी विना कारण घरा बाहेर पडु नये , गर्दी जाऊ नये , मास्क , सेनिटाइजर व सोशल डिस्टेन्स चे काटेकोरपणे पालन करुन कोरोना  हद्दपार करण्याकरिता शासनाला , नगर परिषद प्रशासनाला व कन्हान पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे कडकडीचे आव्हाहन अमोल साकोरे यांनी नागरिकांना केले आहे .

या प्रसंगी प्रतीक भोपळे , प्रमोद दहीवलकर , हर्ष पाटील , मुन्ना मधुमटके , सह आदि अमोल साकोरे मित्र परीवार चे पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

पो. अ़धिक्षक राकेश ओला हयांनी वाहन चालक व नागरिकांना कोव्हीड विषयी केली जनजागृती

Tue Apr 27 , 2021
पो. अ़धिक्षक राकेश ओला हयांनी वाहन चालक व नागरिकांना कोव्हीड विषयी केली जनजागृती कन्हान : – स्व:ईच्छा कडक लॉकडाऊन च्या पहिल्या दिवसी कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड चौकात नाकेबंदी दरम्यान पोलीस अधिक्षक मा.राकेश ओला साहेबानी भेट देऊन दुचाकी, चारचाकी वाहन चालकास व वयोवृध्द नागरिकांना थांबवुन कोव्हीड संदर्भात माहीती देत जनजागृती करित विना […]

Breaking News

Archives

Categories

Meta