नौकरी न मिळाल्याच्या नैराश्यातुन इंजीनिअर युवकांची पुलाखाली उडी मारून आत्महत्या

नौकरी न मिळाल्याच्या नैराश्यातुन इंजीनिअर युवकांची पुलाखाली उडी मारून आत्महत्या

कन्हान : – बी ई शिक्षण घेऊन इंजिनिअर होऊन मागील एका वर्षापासुन नौकरी न मिळाल्या नैराश्या तुन कंटाळुन व कोरोना बाधित झाल्याने ३५ वर्षीय हेमराज वकलकर या युवकाने कन्हान नदी पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याने पो स्टे कन्हान ला मर्ग दाखल करण्यात आला. 

       विवेकानंद नगर कन्हान येथील हेमराज रामकृष्ण वकलकर वय ३५ वर्ष हा (दि.२३) एप्रिल ला दुपारी २. ३० वाजता घरी कुणालाही न सांगता निघुन गेला. त्या चा नातेवाईका कडे शोध घेतला असता तो कोठेही मिळुन न आल्याने फिर्यादी वडील रामकृष्ण वकलकर यांनी पो स्टे कन्हान ला मिसींग दाखल केल्याने (दि. २५) ला दुपारी १.४५ वाजता दरम्यान पो स्टे कन्हान येथुन फोन केला की कन्हान नदीच्या पुलाखाली एका इसमा चा मुतदेह मिळाला आहे. तेव्हा पोहवा अरूण सहारे व फिर्यादी वडील यांनी कन्हान नदी पुलाखाली जाऊन पाहीले असता तो मुतदेह त्याच्या मोठा मुलगा हेमराज वकलकर चा होता. हेमराज रामकृष्ण वकलकर या युवकाने बी ई परिक्षा पास हो़ऊन इंजिनिअर झाला होता. मागील एका वर्षापासुन नौकरी न मिळा ल्याच्या नैराश्यातुन व कोरोना बाधित झाल्याने घरी कुणालाही न सांगता (दि.२३) ला निघुन गेला आणि कन्हान नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. सदर प्रकरणी फिर्यादी वडील रामकृष्ण श्रावणजी वकलकर वय ६२ वर्ष रा विवेकानंद नगर कन्हान यांचे रिपोट वरून परी.पो. उप अधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात पोहवा अरूण सहारे व मंगेश सोनटक्के हयानी कलम १७४ जाफॉ कायद्यान्वये मर्ग दा़खल करून मुतदेह नातेवाईकांना सोपवुन पुढील तपास करित आहे. 


मृतक हेमराज वकलकर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कोरोना ने मृतक परिवारास १५ लाख रुपयाचा निधी द्या. मा प्रधानमंत्री ना मांगणी. 

Thu Apr 29 , 2021
कोरोना ने मृतक परिवारास १५ लाख रुपयाचा निधी द्या. मा प्रधानमंत्री ना मांगणी.  कन्हान : – सामाजिक क्षेत्रात कार्यरत जागरूक कार्य कर्त्याना मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ना निवेदन प्रेषित (पाठवुन) ज्वलंत मांगणी कडे लक्ष केंद्रीत करून मागील एका वर्षापासुन कोरोना महामारीमुळे मुतक व्यक्तीच्या परिवारांस १५ लाख रूपयाचा निधी देण्या ची मागणी […]

Archives

Categories

Meta