महाराष्ट्र दिन व कामगार दिवस निमित्य वृध्दाश्रम येथे अन्न वाटप : कल्याणी सरोदे

*महाराष्ट्र दिन व कामगार दिवस निमित्य वृध्दाश्रम येथे अन्न वाटप*

*अन्नदान सर्वात श्रेष्ठदान – कल्याणी सरोदे*

कन्हान – कांन्द्री – कन्हान येथील सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट कल्याणी सरोदे द्वारे महाराष्ट्र दिन व कामगार दिवस निमित्य वृध्दाश्रम मनसर येथे भेट देऊन अन्नदान वाटप करुन महाराष्ट्र दिन व कामगार दिवस थाटात साजरा करण्यात आला.

राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे शासनाने नियमावली कडक करुन लाॅकडाऊन लावण्यात आल्याने रामटेक तालुक्याचा  मनसर येथील लाॅकडाऊन मुळे वृद्धाश्रम ची परिस्थीती बिकट झाल्याने तेथील नांगरिकांन वर उपाशी पोटी राहण्याची वेळ आली असता कल्याणी सरोदे हि ने मनसर येथे वृद्धाश्रम मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिवस निमित्य भेट दिली असता तेथील नागरिकांना १०० किलो तांदुळ , ७० किलो गहु व तेलाचे डब्बे वाटप केले . या वेळी कल्याणी सरोदे हि ने नागरिकांना कोव्हिड 19 विषयी जानकारी देत विविध विचार मांडले . या कार्यात महेंन्द्र भुरे यांनी कल्याणी सरोदे ला सहकार्य केले तर या उत्तम कार्याबद्दल कैलाश रामटेके यांनी कल्याणी सरोदे चे आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

विधि संघर्ष ग्रस्त बालकाचा मुलीवर केला अतिप्रसंग

Sun May 2 , 2021
विधि संघर्ष ग्रस्त बालकाचा मुलीवर केला अतिप्रसंग #) फिर्यादी च्या तक्रारीने कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.  कन्हान:: –  पोलीस स्टेशन अंतर्गत नेहरू गेट च्या समोर खदान नंबर ३ कडे जाणा-या रस्त्याच्या बाजुला मुलगी बक-या चारत असतांना विधि संघर्ष ग्रस्त बाल काने मुलीवर अतिप्रसंग केल्याने अरोपीच्यी […]

Breaking News

Archives

Categories

Meta