पो उपअधिक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांचा उत्कुष्ट कार्याबद्दल सत्कार  

पो उपअधिक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांचा उत्कुष्ट कार्याबद्दल सत्कार

#) मराठा सेवा संघ व ग्रामिण पत्रकार संघ व्दारे छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार.  


कन्हान : – पोलीस स्टेशन ला १ महिना १२ दिवसात परीवेक्षाधिन पोलीस उप अधिक्षक सुजितकुमार क्षीरसागर हयांनी कन्हान पोलीस थानेदार म्हणुन कोरोना बिकट संकट काळात परिसरात उत्कुष्ट कार्य करित शांती सुव्यवस्था प्रस्थापित केल्याबद्दल मराठा सेवा संघ व ग्रामिण पत्रकार कन्हान व्दारे मा. सुजित कुमार क्षीरसागर साहेबाना छत्रपती शिवाजी महाराजां ची प्रतिमा देऊन सत्कार करून कर्तव्यदक्ष भावीकार्या स शिवशुभेच्छा देण्यात आल्या. 

         कन्हान पोलीस स्टेशन येथे १ एप्रिल २०२१ ला ला परिवेक्षाधिन पोलीस उपअधिक्षक मा सुजितकुमार क्षीरसागर हयांनी कन्हान थानेदार म्हणुन पदभार सां भाळुन परिसरातील रेती, कोळसा चोरी व इतर अवैद्य धंद्यावर अंकुश लावुन कोरोना बिकट काळात दररोज विविध कार्यवाई करून गुन्हेगारांना पकडुन गुन्हे दाख ल केल्याने अवघ्या १ महिना १२ दिवसात कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरात उत्कृष्ट कार्य करित शांती सुव्यवस्था प्रस्थापित करित काटोल पोलीस स्टेशनला कर्तव्यावर प्रस्थान करित असल्याने बुधवार (दि.१२) मे २०२१ ला कन्हान पोलीस स्टेशन येथे सायंकाळी मराठा सेवा संघ व ग्रामिण पत्रकार संघ कन्हान व्दारे परीवेक्षाधिन पो. उप अधिक्षक मा. सुजितकुमार क्षीरसागर साहेबाना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करून भावी जिवनात व पोलीस विभागात प्रामाणिक पणे उत्कुष्ट कर्तव्यदक्ष कार्य करून उन्नती करण्याकरिता मराठा सेवा संघ कन्हानचे शांताराम जळते, ग्रामिण पत्रकार संघ नागपुर जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, कमल सिंह यादव, सुनिल सरोदे, ऋृषभ बावनकर आदीने  शिवशुभेच्छा दिल्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मनोरूग्ण महिलेच्या मदतीला धावले कन्हान चा रजनीश व सावनेर चा मानवदुत हितेश बन्सोड

Fri May 14 , 2021
मनोरूग्ण महिलेच्या मदतीला धावले कन्हान चा रजनीश व सावनेर चा मानवदुत हितेश बन्सोड # ) ” मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात द्या.” कन्हान : – पोलीस स्टेशन परिसरात तीन दिवसापासुन असलेली निराधार मनोरूग्ण महिलेस बघुन रंजनीश (बाळा) मेश्राम यांनी ती तुमसर देवाळीची असल्यांची खात्रीशीर माहीती काढुन हितज्योती आधार फाऊंडेशन सावनेर […]

Archives

Categories

Meta