वराडा येथे अवैद्य देशी दारू विक्री करताना आरोपीस कन्हान पोलीसांनी पकडले

वराडा येथे अवैद्य देशी दारू विक्री करताना आरोपीस कन्हान पोलीसांनी पकडले. 

#) देशी दारू भिंगरी च्या १० निपा व एक्टीवा स्कुटी सह एकुण ७०,६०० रु. चा मुद्देमाल जप्त. 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत वराडा येथे शिव मंदिर जवळ एक इसम आपल्या एक्टीवा दुचाकीत  दारु ठेवुन विक्री करण्याची गुप्त माहितीने कन्हान पोलीसांनी वराडा येथे शिव मंदिर जवळ धाड मारुन दारु विक्री करतांना एक इसमास पकडुन आरोपी जवळुन देशी दारू भिंगरी सत्रा नंबर १ च्या १० निपा व एक्टीवा स्कुटी दुचाकी सह एकुण ७०,६०० रू. चा मुद्देमाल जप्त करित कारवाई करण्यात आली.  

        प्राप्त माहितीवरून सोमवार दि. २४ मे२०२१ ला रात्री ०७:०० ते ०७:४५ वाजता दरम्यान कन्हान पोली सांना दारू विक्रीची गुप्त माहिती मिळाल्याने वराडा येथे शिव मंदिर जवळ धाड मारून आरोपी सुनिल अजाबराव देऊळकर वय ३४ वर्ष रा. शंकर नगर कन्हान हा आपल्या पांढर्या रंगाचा एक्टीवा स्कुटी दुचाकी क्र. एम एच ४० बी एस ०५८० च्या डिक्कीत दारू ठेवुन विक्री करतांना मिळुन आल्याने त्याच्या एक्टीवा स्कुटीच्या डिक्कीतुन १० निपा देशी दारू भिंगरी सत्रा नंबर १ एकुण १८० एम एल प्रमाणे १८०० एम एल किंमत ६०० रुपयाचा माल अवैध रित्या बीना परवाना मिळुन आल्याने त्याचा जवळुन एक्टीवा स्कुटी किंमत ७०,००० रुपये व दारु किंमत ६०० रुपये असा एकुण ७०,६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सरकार तर्फे फिर्यादी स.फौ येथु जोसेफ बक्कन नंबर ११६ पोस्टे कन्हान यांच्या तक्रारी वरून आरोपी सुनिल अजबराव देऊळकर विरुद्ध कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेत. आरोपी सुनिल देऊळकर यास दोषारोपपत्र कोर्टात पेश करते वेळी हजर राहण्याची समज देऊन सोडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

दोनदा भूमिपूजन करून सुध्दा कामाच्या प्रतिक्षेत

Tue May 25 , 2021
दोनदा भूमिपूजन करून सुध्दा कामाच्या प्रतिक्षेत कन्हान ता.25  : खंडाळ्यातील पांदण रस्ता कामाच्या प्रतिक्षेत असून या रस्त्याचे भूमिपूजन आमदार आशिष जयस्वाल यांनी दोनदा केले आहे पण पावसाळा जवळ येऊनही पांदण रस्त्याच्या कामाला हात न लागल्यामुळे शेतकर्‍यात प्रचंड असंतोष आहे. खंडाळा ( घटाटे )ते गहू हिवरा या रस्त्यावरून श्री विनायक हटवार […]

Archives

Categories

Meta