कन्हान येथे  शिवराज्याभिषेक दिवस थाटात साजरा

*कन्हान येथे  शिवराज्याभिषेक दिवस थाटात साजरा*

*शिवाजी नगर मित्र परिवार , कन्हान शहर विकास मंच ,  द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

 

*शिवाजी नगर मित्र परिवार , कन्हान*

कन्हान – शिवाजी नगर मित्र परिवार द्वारे शिवराज्याभिषेक दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता परिसरात वृक्षारोपण करून शिवराज्याभिषेक दिवस थाटात साजरा करण्यात आला . या प्रसंगी कार्यक्रमात मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते

*कन्हान शहर विकास मंच , कन्हान*

कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे शिवराज्याभिषेक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले  असुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला जेष्ठ नागरिक भरत सावळे यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता मंच सचिव प्रदीप बावने यांनी शिवराज्याभिषेक दिना निमित्य मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत शिवराज्याभिषेक दिवस थाटात साजरा करण्यात आला .

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , कोषाध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण , प्रवीण माने , सुषमा मस्के , वैशाली खंडार सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

केंद्र सरकार च्या पेट्रोल-डीजल-गैस सिलिंडर दरवाढ विरुद्ध कांग्रेस चे तीव्र आंदोलन

Mon Jun 7 , 2021
*केंद्र सरकार च्या पेट्रोल-डीजल-गैस सिलिंडर दरवाढ विरुद्ध कांग्रेस चे तीव्र आंदोलन* कन्हान ता 07      महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार व  राजेंद्र मुलक अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या सूचनेनुसार सोमवार( दि07) रोजी कन्हान येथे पेट्रोल-डीजल-गैस सिलिंडर दरवाढ विरुद्ध चक्रधर पेट्रोल पंप कन्हान येथे […]

Breaking News

Archives

Categories

Meta