कन्हान परिसरात ६९३ नागरिकांचे लसीकरण

कन्हान परिसरात ६९३ नागरिकांचे लसीकरण

कन्हान : –  प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे १२९ व जे एन दवाखाना कांद्री ८९ आणि टेकाडी कोळसा खदान आंढणवाडी क्र ६ 

येथील शिबीरात १४६  नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे बनपुरी, डुमरी कला व साटक येथे ३२९ असे कन्हान परिसरात एकुण ६९३ लोकांना लसीकरण करण्यात आले. 

            कोरोना विषाणु जिवघेण्या आजारा पासुन सुरक्षित करण्याकरिता शासना व्दारे शनिवार (दि.१९) पासुन ३० वर्ष व त्या वरील वयाच्या नागरि कांना मोफत लसीकरण मोहीम सुरू सुरूवात करण्यात आले असुन  या अंतर्गत सोमवार (दि.२१) जुन २०२१ ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे १२९ व वेकोलि जे एन दवाखाना कांद्री ला ८९ आणि ग्रा प टेकाडी (कोख) आंगणवाडी क्र ६ येथील शिबीरात १४६ असे प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ३६४ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे बनपुरी, डुमरी कला येथील शिबीर व साटक असे ३२९ नागरिकाना लसीकरण करण्यात आले असुन कन्हान परिसरातील एकुण ६९३ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. कन्हान परिसरातील ३० वर्ष व त्यावरील जास्तीत जास्त नागरिकांनी त्वरित लसीकऱण करून घ्यावे असे आवाहान प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी व साटक च्या डॉ वैशाली हिंगे हयानी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्याची मागणी

Mon Jun 21 , 2021
*सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्याची मागणी* #) भाजपा ओबीसी मोर्चा पारशिवनी तालुका पदाधिकार्यांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन* कन्हान : – ओबीसी आरक्षण स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुका मधील सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्या चा निर्णय दिल्या बद्द्ल महाराष्ट्र सरकार ने सेवानिवृत्त न्यायाधींशा नेमुण तसेच सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्याची […]

Archives

Categories

Meta