जागतिक योग दिन साजरा

जागतिक योग दिन साजरा

सावनेर : मूक बधिर निवासी शाळा , सावनेर च्या वतीने २१ जुन जागतिक योग दिन कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या सभागृहात करण्यात आले . या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक व कर्मचारी व ऑन लाईन कर्ण बधिर विद्यार्थी सहभागी झाले होते . कीडा शिक्षक संजय लुगें यांनी योगाचे प्रात्याक्षिक दिले . या मध्ये योगासने , सुक्ष्म व्यायाम , प्राणायम कृती करुन त्याचे फायदे समजावून सांगितले . शिक्षक , कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्या प्रमाणे कृती केली व सर्वांनी उत्साहपुर्वक वातावरणात योगासने केली . या कार्यक्रमाच्या समारोपाला संस्थेचे अध्यक्ष प्रशांत डवले उपस्थित होते .

त्यांनी मार्गदर्शन करतांना योगासनाचे महत्व सांगितले व तो निरंतर केल्यास आपले आरोग्य निरोगी राहते असे सूचविले प्रास्ताविक संजय लुंगे यांनी केले शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नलिनी आंगोणे , अधिक्षक राजू दलाल यांनी मार्गदर्शन केले . योग दिना निमित्य संस्थेचे सचिव नारायण समर्थ , प्रशासकिय अधिकारी मंगला समर्थ यांनी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे संचालन सुनिल राठोड यांनी केले तर सुवर्णा महाशब्दे यांनी आभार मानले . कार्यक्रमाला कविता केळापूरे , ज्योती राऊत , दुर्गा चेडे , संजय लुंगे , विनोद घोलप , सुनिल राठोड , राजू दलाल , मंगेश शनिवरे , रमेश टेकमेकवार , राजेंद्र बक्षी , संगिता पिसे , ज्योती सावंत , जया काळे , रुखमा भोयर इत्यादीने सहभाग घेतला . व योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

किराया मागितल्याने एट्रासिटी लावण्याची धमकी

Tue Jun 22 , 2021
जिल्हा कार्यालयात संस्था संचालकांचे बोगस कागदपत्र सादर  #) किराया मागितल्याने एट्रासिटी लावण्याची धमकी  कन्हान : – अनेक वर्षापासुन आगैय्या राजैय्या केशेट्टी हे शिवनगर कन्हान येथील रहीवासी असुन हयानी २०१५ मध्ये आपल्या मुलाचा वास्तव्यासाठी गहुहिवरा रोड क्रांदी येथे घर बांधले. गैरअर्जदार कैलाश उद्यभान बोरकर संचालक हयानी उद्यभान पौढ मंतीमंद निवास शाळेकरिता […]

Archives

Categories

Meta