कन्हान परिसरात ८२८ नागरिकांचे लसीकरण

कन्हान परिसरात ८२८ नागरिकांचे लसीकरण

कन्हान : –  प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ३५०, उपकेंद खंडाळा २१८ व जे एन दवाखाना २२० असे ७८८ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे ४० असे कन्हान परिसरात एकुण ८२८ लोकांना लसीकरण करण्यात आले. 

            कोरोना विषाणु जिवघेण्या आजारा पासुन सुरक्षित करण्याकरिता शासना व्दारे बुधवार (दि.२३) जुन २०२१ पासुन १८ वर्ष व त्यावरील वया च्या नागरिकांना मोफत लसीकरण मोहीम सुरू सुरूवात करण्यात आली असुन  आज (दि.२६) जुन २०२१ ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ३५० उपकेंद्र खंडाळा २१८ व जे एन दवाखाना कांद्री २२० असे प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ७८८ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे ४० नागरिकाना लसीकरण करण्यात आले असुन कन्हान परिसरातील एकुण ८२८ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. बुधवार (दि.२३) जुन २०२१ पासुन १८ वर्ष व त्यावरील लसीकरण सुरू झाल्याने कन्हान व साटक परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी त्वरित लसीकऱण करून घ्यावे असे आवाहान प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी व साटक च्या डॉ वैशाली हिंगे हयानी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

राजश्री शाहु महाराज जयंती सार्वजनिक वाचनालय कन्हान येथे साजरी

Mon Jun 28 , 2021
राजश्री शाहु महाराज जयंती सार्वजनिक वाचनालय कन्हान येथे साजरी कन्हान : – आरक्षणाे जनक छत्रपती राजश्री शाहु महाराज यांची जयंती सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे थाटात साजरी करण्यात आली.         शनिवार (दि.२६) जुन २०२१ ला सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान व्दारे कोव्हीड-१९ च्या नियमाचे पालन करित कार्यक्रमाचे अध्यक्ष […]

Breaking News

Archives

Categories

Meta