डुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी

डुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत चोरींच्या गुन्ह्यात दिवसेदिवस वाढत असुन डुमरी येथील शेतक-यांच्या  घरा समोर उभा असलेला ट्रैक्टर अज्ञात आरोपी ने  चोरून नेल्याच्या फिर्यादी च्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

           प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.२३) जुलै २०२१ ला रात्री २ ते २:३० वाजता च्या सुमारास डुमरी येथील शेतकरी जनार्धन व्यंकटराव मद्दोपाटी वय ४६ वर्ष याने त्याचा जाॅनडियर कंपनीचा टैक्ट्रर क्रमांक एम एच ४० बीई ५००८ व ट्राॅली क्रमांक एम एच ३१ जी ९६१९ किंमत ३६,०००० रुपये हा आपल्या घरासमोर उभा ठेवला होता सकाळी उठल्यावर दिसुन न आल्या ने गावात शोध घेतला असता मिळुन न आल्याने फिर्या दी जनार्धन यांच्या तोंडी रिपोर्ट वरून कन्हान पोलीसां नी अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र २७६/२०२१ कलम ३७९ भादंवि गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्ह्या चा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

धाब्यावर उभ्या १४ चाकी मालवाहक ट्रकचा टायर आरोपीने चोरून नेला

Wed Jul 28 , 2021
धाब्यावर उभ्या १४ चाकी मालवाहक ट्रकचा टायर आरोपीने चोरून नेला.  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत ५ कि.मी अंतराव रील नागपुर जबलपुर महामार्गावरील अण्णामोड डुम री येथील धाब्यावर जेवण करण्यास जाताना १४चाकी ट्रक उभा करून गेले असता अज्ञात आरोपीने उभ्या ट्रकचा टायर चोरून बोलोरो चारचाकी वाहनात टाकुन नागपुर कडे घेवुन पळुन […]

Archives

Categories

Meta