जुन्या कारणावरून इसमाच्या डोक्यावर दगड मारून जख्मी केले

जुन्या कारणावरून इसमाच्या डोक्यावर दगड मारून जख्मी केले. 

कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत कोळसा खदान नंबर ६ येथे लवकुश सिंग याने जुना कारणावरून सुभाष यादव सोबत झगडा भांडण व शिवीगाळ करू न दगड डोक्यावर मारून जख्मी केल्याने फिर्यादी च्या तक्रारीने कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे.

            प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.२) ऑगस्ट २०२१ ला रात्री ९ वाजता दरम्यान सुभाष शामरूप यादव वय ४२ वर्ष राह. कोळसा खदान नंबर ६ हा आपले मित्रा सोबत पानीपुरी खाण्याकरिता खदान नं. ६ पाणी टाकी जवळ ठेला कडे आला असता तिथे लवकुश महेंन्द्र सिंग वय २० वर्ष राह.कोळसा खदान नंबर ६ हा उभा होता. सुभाष यादव यांने लवकुश सिंग ला म्हटले कि तु मेरे बच्चो को बिना वजह गाली क्यो देता है, तेव्हा लवकुश सिंग ने जुना कारणावरून सुभा ष यादव सोबत झगडा भांडण व शिवीगाळ करून दगड उचलुन डोक्यावर मारून जख्मी केले व जिवे मारण्याची धमकी दिली. अश्या फिर्यादी सुभाष यादव च्या तोंडी तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी लवकुश सिंग विरुद्ध अप क्र ३००/२०२१ कलम ३२४, ५०४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेत गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोली स निरीक्षक अरूण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पो उप निरीक्षक सुनिल अंबर्ते हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

विवेकानंद नगर येथे १० लोंखडी रॉड बंडल २५ हजार रू. मुद्देमालाची चोरी

Wed Aug 4 , 2021
विवेकानंद नगर येथे १० लोंखडी रॉड बंडल २५ हजार रू. मुद्देमालाची चोरी कन्हान : –  विवेकानंद नगर कन्हान येथील शालिक राम साखरकर यांच्या घराच्या बांधकामा करिता आण लेल्या ८ बंडल लोंखडी राड व बाजुच्या घरचे २ बंडल लोंखडी राड एकुण २५ हजार रूपयाचा मुद्देमाल अज्ञा त आरोपी चोरून नेल्याने फिर्यादी […]

Breaking News

Archives

Categories

Meta