जवाहर कन्या कला वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय सावनेर च्या विद्यार्थिनीचे सुयश

*जवाहर कन्या कला वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय सावनेर च्या विद्यार्थिनीचे सुयश*

सावनेर : तालुक्यात मुलींचे एकमेव कला वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखा असलेले जवाहर कन्या कला वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय सावनेर इथे उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालात तिन्ही शाखेच्या मुलींनी बाजी मारत भरघोष यश संपादन केलेले आहे.
जवाहर कन्या विद्यालय,सावनेर हि सावनेर तालुक्यातील एकमेव मुलींची शाळा असून परिसरातील ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थिनी इथे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करतात अशा विद्यार्थिनींना पुढील शिक्षणात अडचण निर्माण होऊ नये म्हणून विद्या प्रसारक मंडळ सावनेरच्या व्यवस्थापक मंडळांनी मुलींसाठीच उच्च माध्यमिक विद्यालय ची सोय करून दिली आणि त्यामध्ये तिन्ही शाखेचा अंतर्भाव केला कला शाखेत भूगोल विषयाचा अंतर्भाव वाणिज्य शाखा इंग्रजी माध्यमातून आणि विज्ञान शाखा ,सोबतच इतरही विद्यालयाच्या विद्यार्थिनी इथे प्रवेश घेत असतात.
सत्र 2020 21 मध्ये जाहीर झालेल्या निकालात चांगले गुण संपादित करून विद्यार्थिनींनी शाळेला गौरव मिळवून दिलेला आहे

*विज्ञान शाखा*
*प्रथम क्रमांक कु.नेहा उमाठे- 88.83%
*द्वितीय क्रमांक कु.समीक्षा बावणे – 88.17%
*तृतीय क्रमांक कु.नम्रता शेंडे- 87.00%

*वाणिज्य शाखा*
*प्रथम क्रमांक कु.मोनिका पराडकर -88.33%
*द्वितीय क्रमांक कु.राजश्री खंडाळे -85.83%
*तृतीय क्रमांक कु.वृषाली झाडे-83.83%

*कला शाखा*
*प्रथम क्रमांक कु.दीक्षा वाडेकर -84.17%
*द्वितीय क्रमांक कु.विशाखा महल्ले-84.00%
*तृतीय क्रमांक कु.रूपाली लाड-81.83%

विद्यार्थिनींनी मिळविलेल्या यशाबद्दल विद्या प्रसारक मंडळ,सावनेर चे अध्यक्ष मा.श्री.विजयराव डाहाके,सचिव मा.श्री.नरेंद्रजी डाहाके,उपाध्यक्ष मा.श्री.मदनरावजी डाहाके, संस्थेचे सभासद मा.सौ.विणा डाहाके, मा.श्री.यशपालजी डाहाके,मा.श्री.डॉ.राहुलजी डाहाके ,मा. सौ.सोनाली डाहाके, मा.श्री.स्वप्नील डाहाके शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीमती रेणुका बेले, पर्यवेक्षक मा.श्री.मुरलीधर खाटीक,आणि सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे हिंदु गौरव दिवस थाटात साजरा*

Fri Aug 6 , 2021
*कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे हिंदु गौरव दिवस थाटात साजरा* #) हनुमान मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे हिंदु गौरव दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मंदिर गांधी चौक येथे करुन प्रभु श्रीराम च्या प्रतिमेचे पुजन करुन व विविध कार्यक्रमाने हिंदू गौरव दिवस थाटात […]

Breaking News

Archives

Categories

Meta