गोंडवाना गणतंत्र पार्टी कार्यकारणी घोषित

गोंडवाना गणतंत्र पार्टी कार्यकारणी घोषित


कन्हान : – गोंडवाना गणतंत्र पार्टी ची नागपुर जिल्हया तील कन्हान शहरात वरिष्ठ पदाधिका-यांच्या बैठकीत ओबीसी मोर्चा, अनुसुचित जाती प्रदेश अध्यक्ष व कन्हान शहराची नविन कार्यकारणी घोषित करण्यात आली. 

            नुकतिच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुखलाल मडावी यांचे रायनगर कन्हान येथील कार्यालयात महा राष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरीशजी उइके यांचे अध्यक्षेत व महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष महेश बम्हनोटे, नागपुर जिल्हाध्यक्ष धनराज मंडावी, जिल्हा पदाधिकारी राम लाल पट्टा, राजेश टेकाम यांच्या प्रमुख उपस्थित आदीवासी समाज बांधवाचे होणारे शोषण व गोंडवाना गण तंत्र पार्टी वाढविण्याच्या दुष्टीने बैठकीत विचार विमर्स, चर्चा करून ओबीसी मोर्चा महा. प्रदेश अध्यक्ष पदी सचिन दहीकर, अनुसूचित जाती महाराष्ट्र अध्यक्ष पदी कामठीचे गणेश पाटील, नागपुर जिल्हा संपर्क प्रमुख सर्जेराव सय्याम, उमरेड तालुका अध्यक्ष देविदास सिडाम यांची नियुक्ती करण्यात आली .

आणि कन्हान शहराची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली. यात कन्हान शहर अध्यक्ष सोनु अरविंद मसराम, उपा ध्यक्ष प्रकाश मडावी, सचिव विरेंद्रसिंग मरकाम, महा सचिव महादेव उइके व कन्हान शहर महिला अध्यक्ष मायाताई कोराम आदी पदाधिका-यांची नियुक्ती कर ण्यात आली. या बैठकीस महिला अध्यक्षा पारशिवनी तालुका वंदना भलावी, उपाध्यक्षा पारशिवनी अर्चना आहाके, संदिप परते, शंकरदादा इनवाते सह गोंगपा कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

महामार्ग पोलीस केंद्र पाटणसावंगी तर्फे चालक दिन उत्साहात साजरा

Fri Sep 17 , 2021
महामार्ग पोलीस केंद्र पाटणसावंगी तर्फे चालक दिन उत्साहात साजरा सावनेर तां प्रा: देशातील दळणवळण व परिवहन क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक चालक असून त्यांची साधारण भूमिका आहे. देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान बाबत चालक या घटकाचे गुणगौरव करण्याच्या दृष्टीने दरवर्षी 17 सप्टेंबर हा चालक दिन म्हणून घोषित करण्यात आल्याने सर्व वाहनचालकांना शुभेच्छा […]

Breaking News

Archives

Categories

Meta