विनयभंग चा गुन्हा दाखल

विनयभंग चा गुन्हा दाखल

कन्हान : – आरोपी ला फिर्यादी /पिडीता र्हिच्या पतीने उपचाराकरिता लावलेले पैसे मागण्या करिता गेले असता आरोपीतानी संगनमत करून पतीला व तिला मारहाण करून तिचा अश्लिल शिविगाळ करून विनयभंग केल्याच्या तक्रारीने कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करून आरोपीताचा शोध कन्हान पोलीस घेत आहे.

बुधवार (दि.१५) सप्टेंबर ९ ते ९. ३० वाजता दरम्यान यातील आरोपीला फिर्यादी /पिडीता वय ५१ वर्ष हिच्या पतीने उपचाराकरिता २ लाख २० हजार रूपये लावले होते. ते पैसे परत मागण्याकरिता फिर्यादी व तिचा पती गेले असता आरोपी क्र १, २) रूखमिनी वाघमारे ३) प्रशांत वाघमारे, ४) आशिष प्रेमदास वाघमारे वय ४५ वर्ष चारही राह. गणेश नगर  प्रभाग क्र ३ कन्हान यांनी संगनमत करून फिर्यादीच्या पतीस हातबुक्यानी मारहाण केली. फिर्यादी ही मध्यस्थी आली असता तिला सुध्दा आरोपीतानी मारहाण करून तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला व अश्लिल भाषेत  शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो स्टे कन्हान येथे आरोपी विरूध्द कलम ३५४, ३५४ अ, ३५४ ब, ३२३ भादंवी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. गुन्हया चा पुढील तपास सपोनि सतिश मेश्राम हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

आमदारांचे आश्वासन हवेत तर पोलीस निरीक्षकांची कारवाई फजा : जनतेची ओरड

Fri Sep 24 , 2021
*आमदारांचे आश्वासन हवेत तर पोलीस निरीक्षकांनी कारवाई फजा *तारसा रोड चौक ते चाचेर मार्गावरील जड वाहतुक बंद करा, अन्यथा आंदोलन *नागरिकांचे कन्हान पोलीस प्रशासनाला निवेदन *२७ तारखे नंतर तीर्व आंदोलन करु – राजेंद्र शेंदरे (नगरसेवक ) कन्हान – कन्हान तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन गेल्या काही दिवसान पासुन […]

Breaking News

Archives

Categories

Meta