स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

# ) स्व श्री मारोतराव बढिये स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार*


कन्हान : – शाळा बंद पण शिक्षण सुरू या धोरणां तर्गत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने स्व श्री मारोतराव बढिये स्मृती प्रतिष्ठान तर्फे १५ ऑगस्ट रोजी ऑनलाईन भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 

      या स्पर्धेतील विजेत्यांना रविभवन नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात गुरुवारी (ता २३) सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाज्योतीचे संचालक डॉ बबनराव तायवाडे, स्व श्री मारोतराव बढिये स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमती रजनी बढिये, पदवीधर आमदार मा अभिजित वंजारी, शिक्षण महर्षी श्री खुशालराव पाहुणे, संघर्ष वाहिनीचे संघटक श्री दिनानाथ वाघमारे, शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे उपस्थित होते.

उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहळ्या निमित्त स्व श्री मारोतराव बढिये स्मृती प्रतिष्ठान तर्फे धर्मराज प्राथमि क शाळा कन्हान येथील वंश भादे, सुमीत खडसे व मयंक चौधरी या तीन विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला धर्मराज प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री खिमेश बढिये, श्री भिमराव शिंदेमेश्राम, श्री नरेंद्र कडवे, नेहा प्राथमि क शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश खोब्रागडे, सौ प्रणाली रंगारी, सौ रुपाली मालोदे, श्री दिनेश गेटमे, सौ रिना टाले, श्री चंदू चौधरी, सौ सरीता भादे, श्री विरेंद्र खडसे, सौ करुणा खडसे, श्री शेषराव खार्डे, श्री धिरज यादव, श्री मुकुंद अडेवार, श्री मनीष जुनोनकर, श्री रंगराव पाटील, श्री कमलेश सहारे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पिपरी- कन्हान येथे जीवन रक्षक दल कार्यकारणी गठीत

Sun Sep 26 , 2021
पिपरी- कन्हान येथे जीवन रक्षक दल कार्यकारणी गठीत #) अध्यक्ष विजय केवट तर सचिवपदी महादेव केवट यांची निवड.  कन्हान : – लगतच असलेल्या पिपरी येथे भारतीय भोई विकास मंडळाचे राष्ट्रीय महासचिव दिलीप मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत (दि.२५) सप्टेंबर ला पावन हनुमान मंदिर देवस्थान परिसरातील सभागृहात जीवन रक्षक दल कार्यकारणी गठीत करण्यात […]

Archives

Categories

Meta