महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची संयुक्त जयंती थाटात साजरी

*महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची संयुक्त जयंती थाटात साजरी*

कन्हान शहर विकास मंच द्वारे आयोजन

कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे राष्ट्रपीता महात्मा गांधी व पुर्व पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
शनिवार 2 आॅक्टोंबर राष्ट्रपीता महात्मा गांधी व पुर्व पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन मंच नवनिर्वाचित सदस्य सुरज वरखडे यांच्या हस्ते राष्ट्रपीता महात्मा गांधी व पुर्व पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता मंच सदस्य कामेश्वर शर्मा ,महादेव लिल्हारे यांनी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जीवन चरित्र्या वर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , हरीओम प्रकाश नारायण , कामेश्वर शर्मा , महेंद्र साबरे , हर्ष पाटील , सुरज वरखडे , महादेव लिल्हारे , आकाश डोंगरे , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

सावनेर येथे लियाफी चा ५७ वा स्थापना दिन साजरा सावनेर

Sun Oct 3 , 2021
सावनेर येथे लियाफी चा ५७ वा स्थापना दिन साजरा सावनेर सावनेर :  राम गणेश गडकरी सभागृहात गांधी जयंती दिनी असलेल्या लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया (लियाफी) चा 57 वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक डॉ. कमलाकर देशपांडे, प्रमुख पाहुणे लियाफीचे माजी विभागीय अध्यक्ष शेषराव […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta