शहरात ठिकठिकाणी स्वच्छता व स्वच्छते विषयी जनजागृति 

शहरात ठिकठिकाणी स्वच्छता व स्वच्छते विषयी जनजागृति 

कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय येथे राष्ट्रपीता महात्मा गांधी व माझी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नप.नगराध्यक्षा सौ. करुणाताई आष्टणकर यांच्या हस्ते महात्मा गांधी व माझी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करुन दीप प्रज्वलन सोबत विविध कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. केंन्द्र शासना च्या गाईड लाईन्स प्रमाणे “आझादी का अमृत महोत्सव” या पार्श्वभुमीवर नप.नगराध्यक्षा सौ. करुणाताई आष्टणकर यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद कन्हान – पिपरी व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरात ठिकठिकाणी स्वच्छता व स्वच्छते विषयी जनजागृति करण्यात आली. याप्रसंगी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार घेण्यात आला. कन्हान शहरात वेळोवेळी प्रत्येक प्रभागात स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश नप नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर यांनी अधिकाऱ्यांना दिले .

याप्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद नगरसेवक राजेंद्र शेंदरे, राजेश यादव, योगेंद्र रंगारी, मनिष भिवगडे , नगरसेविका रेखा टोहणे, गुंफा तिडके, कल्पना नितनवरे , पुष्पा कावडकर, नगर परिषद अधिकारी फिरोज बिसेन , संकेत तलेवार, हर्षल जगताप, नेहरू युवा केंद्र संगठन द्वारे तनुश्री आकरे सह आदी नप.अधिकारी, कर्मचारीगण उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान नगर परिषद येथे "अमृत महोत्सव" निमित्य स्वच्छता दुतांचा सत्कार

Wed Oct 6 , 2021
*कन्हान नगर परिषद येथे “अमृत महोत्सव” निमित्य स्वच्छता दुतांचा सत्कार* सफाई कर्मचारी यांच्या संपुर्ण कुटुंबाच्या सुरक्षिते करिता विशेष विमा असावा – विशाखा ठमके कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय येथे ७५ व्या “अमृत महोत्सव” निमित्य सफाई मित्र सम्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमा मध्ये महात्मा गांधी व […]

Archives

Categories

Meta