कन्हान येथे विश्व एड्स दिवस निमित्य नागरिकांना निरोध वाटुन केली जनजागृति

*कन्हान येथे विश्व एड्स दिवस निमित्य नागरिकांना निरोध वाटुन केली जनजागृति*

मानवाधिकार संरक्षण संघटन द्वारे आयोजन

कन्हान – कन्हान येथे विश्व एड्स दिवस निमित्य मानवाधिकार संरक्षण संघटन द्वारे जनजागृति अभियानाचे आयोजन करण्यात आले असुन नागरिकांन मध्ये जनजागृति करुन व नागरिकांना निरोध वाटप करुन विश्व एड्स दिवस साजरा करण्यात आला .


विश्व एड्स दिवस १९८८ पासून दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जात असुन एचआयव्ही संसर्गाच्या प्रसारामुळे झालेल्या एड्सच्या साथीच्या आजाराविषयी जागरुकता वाढवणे आणि या आजाराने मरण पावलेल्या लोकांसाठी शोक व्यक्त करणे हा असुन सरकारी आणि आरोग्य अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि जगभरातील लोक एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणावरील शिक्षणासोबत हा दिवस पाळतात. एड्सचे पूर्ण नाव ‘अक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम’ आहे आणि हा एक प्रकारचा विषाणू आहे, ज्याचे नाव एचआयव्ही (ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस) आहे . गुरुवार दिनांक १ डिसेंबर ला विश्व एड्स दिवस निमित्य कन्हान येथे मानवाधिकार संरक्षण संघटन द्वारे जनजागृति अभियानाचे आयोजन करण्यात आले असुन नागरिकांन मध्ये जनजागृति करुन व नागरिकांना निरोध वाटप करुन विश्व एड्स दिवस साजरा करण्यात आला .
या प्रसंगी पंकज रामटेके, चेता फुले, अश्विन उमराय, मनोज मेश्राम, हेमंत बांगरे, अश्विन हेलवकर, हरिदास तिरोडे, विजय दुर्गा, राहुल चकोले सह आदि नागरिक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

घरकुल आवास बांधकाम तात्काळ सुरु करण्याची मागणी* नागरिकांचे नप मुख्याधिकार्यांना निवेदन

Thu Dec 2 , 2021
*घरकुल आवास बांधकाम तात्काळ सुरु करण्याची मागणी* नागरिकांचे नप मुख्याधिकार्यांना निवेदन कन्हान – कन्हान – पिपरी शहरातील गरजु नागरिकांनी नगर परिषद कार्यालय येथे इंदिरा गांधी आवास योजनेचे घरकुल आवास मिळण्याकरिता अर्ज दाखल केले होते . परंतु आजपर्यंत या योजनेचा लाभ गरजु नागरिकांना मिळाला नसल्याने सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार यांनी […]

Breaking News

Archives

Categories

Meta