कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी स्वर्ग श्री बिपीन रावत यांना दिली श्रद्धांजली

 

         

*कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी स्वर्ग श्री बिपीन रावत यांना दिली श्रद्धांजली

कन्हान – भारतीय लष्कराचे दीर्घकाळ सेवा करणारे माजी लष्कर प्रमुख आणि चीफ आॅफ डिफेंन्स स्टाफ (सीडीएस) स्वर्ग श्री बिपीन रावत हे हेलिकॉप्टर ने आपल्या पत्नी सोबत वेलिंगटन येथे एका कार्यक्रमात जात होते . या दरम्यान खराब हवामाना मुळे तमिळनाडुतील कुन्नुर मध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले . यात बिपीन रावत हे गंभीर जख्मी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . मात्र उपचारा दरम्यान त्यांचा निधन झाला .  बिपीन रावत यांच्या निधना नंतर संपुर्ण देशात शोक चे वातावरण निर्माण झाल्याने कन्हान येथे शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी तारसा रोड शहिद चौक येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मंच मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते  स्वर्ग श्री बिपीन रावत यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन श्रद्धांजली कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी बिपीन रावत यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन  स्वर्ग श्री बिपीन रावत सह घटनेत शहिद झालेल्या १३ वरिष्ठ अधिकार्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित केली .

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव हरीओम प्रकाश नारायण , सहसचिव सुरज वरखडे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , मार्गदर्शक भरत सावळे , सदस्य हर्ष पाटील , महादेव लिल्हारे , प्रकाश कुर्वे , वीर सिंग शाहरुख खान , किरण ठाकुर , अक्षय फुले , शुभम मंदुरकर , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

ड्राइव्ह अँड डाइन रेस्टॉरंट मधील हुक्का पार्लर वर धाड

Sat Dec 11 , 2021
ड्राइव्ह अँड डाइन रेस्टॉरंट मधील हुक्का पार्लर वर धाड सावनेर :  स्थानिक गुन्हे शाखा , नागपूर ग्रामीणची कारवाई दिनांक 11.12.2021 रोजी ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान आपले मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सावनेर उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना खात्रीशिर गोपनिय माहिती मिळाली की , पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत मौजा कवडस शिवारातील सावनेर […]

Breaking News

Archives

Categories

Meta